Shahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल

Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने  वाढदिवसानिमित्ताने  आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.

राजीव कासले | Updated: Nov 2, 2023, 03:11 PM IST
Shahrukh Khan चं चाहत्यांना  वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर  प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल title=

Jawan Release On OTT: बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान आज आपला 58 वा वाढदिवस (Shahrukh Khan 58th Birthday) साजरा करतोय. देशभरात आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस चाहते जल्लोषात साजरा करतायत. सुपरस्टार शाहरुख खाननेही आपल्या चाहत्यांसाठी एक खास गिफ्ट दिलं आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला 'जवान' हा चित्रपट (Jawan) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पठाण चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना जवान चित्रपटाची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे 'जवान' चित्रपटही सुपर-डुपर हिट ठरला. देशात-परदेशात 'जवान' चित्रपटाला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. फक्त भारतात 'जवान' चित्रपटाने 640 कोटींची कमाई करत इतिहास रचला. जगभरात या चित्रपटाने 1100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 

चित्रपटगृह गाजवणारा हा चित्रपट ओटीटीवर केव्हा प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता शाहरुख खानच्या वाढिदिवशी चाहत्यांची ही उत्सुकता संपली आहे. 'जवान' चित्रपट ओटीसी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शिक करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रट आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहाता येणार आहे. SRK ने अनोख्या अंदाजात जवानच्या ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली होती. गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला विनोदी अंदाजात याची घोषणा करण्यात आली होती. रात्री बारा वाजता म्हणजे शाहरुक खान 58 वर्षांचा झाल्यावर एक प्रोमो जारी करण्यात आला. या प्रोमोत शाहरुखने चित्रपट पुढच्या दोन मिनिटात ओटीटीवर प्रदर्शित करा अशी धमकी दिली होती.

प्रोमोत शाहरुख खान एका सर्व्हर रुममध्ये बसलेला दिसतोय. त्यानंतर शाहरुख धमकी देताना दिसतोय. पुढच्या दोन मिनिटात जवान प्रदर्शित करा नाही तर मी तुमच्या टुडुमचा बुडूम बनवेन असं म्हणताना दिसतोय. शाहरुख खानच्या धमकीनंतर बॅकग्राऊंडमधून आवाज येतो आम्ही जवान या विकेंडला रिलीज करतोय. यावर शाहरुख बाय बाय नेटफ्लिक्स (Netflix) असं म्हणताना दिसतोय. यानंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवान चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
जवान हा चित्रपट एटलीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान डबल रोलच्या भूमिकेत आहे. शाहरुख खानबरोबर दक्षिणेची अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, गिरिजा ओक, सुनील ग्रोव्हर या कलाकारांनाही अभिनय साकारला आहे. जवान चित्रपटात दीपिका पादुकोण आणि संजय दत्त यांनीही पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. शाहरुख खानचा जवान हा चित्रपट बॉलिवूडमधअये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.