Gandi Baat Poster Controversy: एकता कपूरनं वेबसिरिजच्या क्षेत्रात जेव्हापासून पाऊल ठेवलं आहे तेव्हापासून तिनं निर्मित केलेल्या कलाकृतींना पाहून नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. मध्यंतरी तिच्या 'गंदी बात' या वेबशोमुळे मोठ्या प्रमाणात वादंग माजला होता. आता कुठे तो वाद कमी होतो आहे तोच त्याच वेबसिरिजवरून आता एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यामुळे एकता कपूर ही नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. सध्या या वेबसिरिजच्या 6 वा सिझन पोस्टर हे वादात आले आहे त्यातून या वेबसिरिजमुळे जनमानात वादंग पसरला आहे. त्यामुळे सध्या ही वेबसिरिज चांगलीच चर्चेत आली आहे. या वेबसिरिजचे सध्या पोस्टर व्हायरल झाले आहेत. ज्यात देवी लक्ष्मीचा अपमान झाला असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये कमळाच्या फुलामध्ये स्त्रियांचे अर्धनग्न साडीतले फोटोज व्हायरल झाले आहेत. हे पोस्टर्स पाहून नेटकऱ्यांनी या पोस्टर्सवरती नाराजी व्यक्त केली असून यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सध्या या पोस्टर्सवरती चारही बाजूंनी टीका होताना दिसते आहे. खासकरून ट्विटरवर या 'गंदी बात'च्या पोस्टरवरून चांगलाच वाद उपस्थित झाला आहे. अशाप्रकारे प्रोनोग्राफीचे उद्दातीकरण केले जाते आहे आणि आपल्या हिंदू देवदेवतांना वारंवार अपमानित केले जाते आहे याबद्दल नेटकऱ्यांनी या पोस्टर्सचा तिखट शब्दात निषेध केला आहे.
सध्या मनोरंजन विश्वात असे वाद वारंवार उपस्थित होताना दिसत आहेत. याचवर्षी दीपिकाच्या भगव्या बिकिनीमुळेही मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यातून अनेकदा चित्रपटातील वादग्रस्त वक्तव्यांवरूनही किंवा संवादांवरूनही अभिनेते आणि अभिनेत्री ट्रोल होतात. गेल्या काही वर्षांपासून चित्रपट आणि वाद हे एकप्रकारे समीकरणच बनून गेलं आहे. 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'लाल सिंग चड्ढा' आणि आता 'आदिपुरूष' या चित्रपटांमुळे बराच वाद निर्माण झाला होता. परंतु या 'गंदी बात'वरून वाद जरी सुरू असला तरीसुद्धा हा सिझन 2021 मध्ये आला होता आणि यावर्षींच्या 25 फेब्रुवारीपासून या 'गंदी बात'चा सातवा सिझनही सुरू झाला आहे.
हेही वाचा - पाच दशकांहून अधिक काळ कलाजगतावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याचं मोटरसायकल अपघातात निधन
सध्या हे पोस्टर व्हायरल झाल्यामुळे सगळीकडूनच टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या पोस्टरमुळे हिंदू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. यातले एक पोस्टर सध्या चर्चेत आले आहे. ज्यात कमळाच्या पानात एक स्त्री साडी घालून आहे व त्याचसोबत तिनं डोक्यावरून पदर घेतला आहे.
Alt Balaji pic.twitter.com/atIiIpboa3
— Nitin Shukla (@nshuklain) June 13, 2023
परंतु या फोटोत तिचं प्रदर्शन अगदी मोहक पद्धतीनं केले आहे. त्याचबरोबर असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यात अशाच एका कमळाच्या पानात एका स्त्रीचा बाह्य भाग उघडा दाखवला आहे. त्यामुळे अशाप्रकारे देवी लक्ष्मीची खिल्ली उडवण्यात आल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.