500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच...

Dream Girl 2 Box Office Collection : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं 'गदर 2' ची गती स्लो केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 26, 2023, 12:58 PM IST
500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच... title=
(Photo Credit : Social Media)

Dream Girl 2 : 'गदर 2' सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात चर्चेत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. या शुक्रवारपासून सनी देओलच्या या चित्रपटाला थिएटरमध्ये तिसरा आठवडा सुरु झाला. दोन आठवडे चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर यंदाच्या आठवड्यातही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. मात्र, आता 'गदर 2' च्या कमाईत वाढ नाही तर घट झाली आहे. त्याचं कारण हा अभिनेता आयुष्मान खुराना आहे. 

आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. आयुष्मान खुरानाच्या चित्रपटानं एडव्हान्स बुकिंगमध्ये थोडी स्लो स्पीड पकडली होती. पण चित्रपट प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी चित्रपटानं चांगलीच स्पीड घेतली. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानं ठिकठाक कमाई केली आहे. आयुष्मान खुरानाला त्याच्या या चित्रपटाकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेवर हा चित्रपट नक्कीच कमाई करणार असे म्हणायला हरक नाही. पहिल्या दिवशी 'ड्रीम गर्ल 2' नं चांगली सुरुवात केली असून 'गदर 2' च्या कमाईवर त्याचा चांगला परिणाम झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'गदर 2' हा चित्रपट थिएटरमध्ये असताना 'ड्रीम गर्ल 2' नं पहिल्याच दिवशी 10.69 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. आयुष्यानच्या या चित्रपटानं 'गदर 2' असताना इतकी कमाई करणं खूप मोठी गोष्ट आहे. 'ड्रीम गर्ल 2' ला समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर अनेकांनी या चित्रपटाला वन टाइम वॉच असे म्हटले आहे. 'ड्रीम गर्ल 2' नं शुक्रवारी जर बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केली तर विकेंडला त्याच्या कमाईत नक्कीच वाढ होईल अशी अपेक्षा सगळ्यांना लागली आहे. एकीकडे आयुष्मानच्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहता दुसरीकडे  'गदर 2' या चित्रपटानं शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर आता पर्यंतची सगळ्यात कमी कमाई केली आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 7.10 कोटींची कमाई केली आहे. 

हेही वाचा : अर्जुन कपूरबरोबरच्या Breakup वर मलायकाचं शिक्कामोर्तब? T-Shirt वरील मजकुराची तुफान चर्चा

सनी देओलच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 426 कोटींचा आकडा पार केला आहे. तर आता कमाईत वाढ होऊन आता 500 कोटींचा आकडा पार करणार अशा अपेक्षा आहेत.