अर्जुन कपूरबरोबरच्या Breakup वर मलायकाचं शिक्कामोर्तब? T-Shirt वरील मजकुराची तुफान चर्चा

Malaika Arora confirms breakup? : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायकानं परिधान केलेल्या त्या स्वेटशर्टवर असलेल्या त्या मेसेजनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 26, 2023, 11:59 AM IST
अर्जुन कपूरबरोबरच्या Breakup वर मलायकाचं शिक्कामोर्तब? T-Shirt वरील मजकुराची तुफान चर्चा title=
(Photo Credit : Viral Bhaiyani / Social Media)

Malaika Arora confirms breakup : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते, तर काहींना त्यांची ही जोडी आवडत नाही. बऱ्याच वेळा त्या दोघांचे फोटो व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. ते दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. काही काळापूर्वी मलायकाचा अर्जुनच्या बड्डे पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, काही काळापासून सोशल मीडियावर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं. त्या दोघांनी या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. पण मलायकानं परिधान केलेल्या स्वेटशर्टवर असा काही मेसेज केला आहे की त्यामुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकानं पांढऱ्या रंगाचा स्वेटशर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तिनं परिधान केलेल्या या स्वेटशर्टवर एक स्माईली इमोजी असून त्यावर 'Lets fall apart...' म्हणजेच (वेगळं होऊया) असा मेसेज लिहिला आहे. खरं म्हणजे मलायकाच्या टी-शर्टवर 'Lets fall apart together' असं म्हटलं आहे. पण together हा शब्द पटकन कोणाच्या नजरेत येत नाही आहे कारण तो तिच्या हातावर असून हॅन्डबॅगमुळे दिसत नाही आहे. हे स्वेटशर्ट मलायकानं का परिधान केलं असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. कारण एकीकडे त्या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे मलायकानं असं स्वेटशर्ट परिधान केलं आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना या बातमीनं मोठा धक्का बसला आहे. कारण अनेकांचे म्हणणे आहे की मलायकानं हा मेसेजे देत तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपचा इशारा दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, नातं असावं तर असं असावं की जे सात जन्म राहिल. मला तिच्यासाठी फार वाईट वाटतंय. काही नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा ही तेव्हापासून सुरु झाली जेव्हा अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या सुट्टीचे फोटो शेअर केले होते. या फोटोत अर्जुन एकटा दिसत होता. त्याची गर्लफ्रेंड मलायका यावेळी त्याच्यासोबत दिसली नव्हती. त्यानंतर मलायका ही एकटीच एपी ढिल्लोच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये स्पॉट झाली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या. 

हेही वाचा : मलायकासोबत ब्रेकअपनंतर 'या' लोकप्रिय इन्फ्लूएन्सरच्या प्रेमात अर्जुन कपूर? ती म्हणते...

दरम्यान, यासगळ्यात अर्जुनचं नाव हे अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलाशी जोडण्यात आले. त्यावर कुशानं प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या व्हायरल होत असलेल्या चर्चांवर कमेंट करत कुशा म्हणाली, 'माझ्याविषयी दररोज इतका मूर्खपणाच्या गोष्टी वाचल्यानंतर, मला माझा स्वतःची ओळख करून द्यावी लागते. मी नेहमीच माझ्याबद्दल अशा चुकीच्या गोष्टी पाहिल्या आहेत. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. नाहीतर तिच्या सोशल लाइफला खूप मोठा धक्का बसेल.'