प्रियंका चोप्राच्या तीन बहिणींविषयी तुम्हाला माहितीये का? चित्रपटसृष्टीतही सक्रिय

Priyanka Chopra Sisters Names: प्रियंका चोप्रा ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते परंतु तुम्हाला माहितीये का की तिच्या तीनही बहीणी चित्रपटसृष्टीत आहेत. परंतु त्या फारश्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 9, 2023, 04:29 PM IST
प्रियंका चोप्राच्या तीन बहिणींविषयी तुम्हाला माहितीये का? चित्रपटसृष्टीतही सक्रिय  title=
July 9, 2023 | do you know about priyanka chopras three sister who are flop but still active in the industry

Priyanka Chopra Sisters: प्रियंका चोप्रा आपल्या दिलखेचक अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. तिचे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. तिचे इन्टाग्रामवर 7 कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या ती तिच्या मुलीच्या संगोपनातही व्यक्त आहे. प्रियंका चोप्राची सर्वाधिक पॉप्यूलॅरिटी आहे. तेव्हा तिला सर्वच जग ओळखतं. परंतु कदाचित काहींना माहिती नसेल की तिच्या तीनही सुलत बहीणी या बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. परंतु प्रियंका चोप्रा एवढं स्टारडम त्यांना मिळलेलं नाही. परिणीती चोप्राला आपण सगळेच ओळखतो परंतु मीरा चोप्रा आणि मन्नारा चोप्रा यांच्याबद्दल अनेकांना माहितीही नसेल, परंतु त्याही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. या लेखातून आपण त्या तिघींविषयी जाणून घेणार आहोत. 

प्रियंकाला एक भाऊ आहे ज्याचं नावं सिद्धार्थ चोप्रा असं आहे. तो अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही तर तो चित्रपट व्यवसायात सक्रिय आहे. पर्पल बेब नावाची प्रोडक्शन कंपनी आहे. ज्यातून प्रियंका आणि तो चित्रपटांची निर्मिती करतात. त्यासोबत प्रियांकाला दोन चुलत बहीणीही आहेत. एक परिणिती चोप्रा जी स्वत: बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे तिचेही फॅन फॉलोईंग अफाट आहे. यावर्षी मेमध्ये तिचा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यांच्या अफेअरची कित्येक दिवस चर्चा सुरू होती अखेर त्यांनी 13 मे रोजी साखरपुडा केला आणि चाहत्यांना धक्का बसला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. परंतु तुम्हाला प्रियंकाच्या अजून दोन बहिणींबद्दल माहितीये का?

हेही वाचा - 17000 शाकाहारी पदार्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्या मास्टरशेफ तरला दलाल कोण होत्या?

मीरा चोप्रा

मीरा चोप्राचा काल वाढदिवस होता. त्यामुळे काल तिची चर्चा होती. मीरा ही 40 वर्षांची आहे. त्याचसोबत तिनं हिंदीसह दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतूनही कामं केली आहेत. तिच्या अभिनयाचेही सर्वच जणं फॅन्स आहेत. 1920 लंडन या हिंदी चित्रपटातून तिनं कामंही केलं आहे. यावेळी तिच्यासोबत शर्मन जोशीही होता. त्याचसोबतच तिनं अनेक दाक्षिणात्त्य चित्रपटातूनही कामं केली आहेत. इन्टाग्रामवरही ती चांगलीच सक्रिय आहे आणि त्याचसोबत तिचेही अनेक फॉलोवर्सही आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मन्नरा चोप्रा

मन्नरा चोप्राही प्रियंका चोप्राची चुलत बहीण आहे. तिनंही दाक्षिणात्त्य चित्रपटांतून कामं केली आहेत. ZID या हिंदी चित्रपटातूनही ती दिसली होती. तिही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचेही इन्टग्रामवर चांगले फॉलोवर्स आहेत. ती अनेकदा प्रियंका चोप्रासोबत स्पॉट झाली आहे. तिच्याविषयी फारश्या चर्चा रंगताना दिसत नाहीत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु प्रियंकाच्या दोन्ही बहीणी या फारश्या लाईमलाईटमध्ये दिसत नाहीत.