Mahesh Manjrekar and Salman Khan: लोकप्रिय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला तर त्याचसोबत अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील त्याचे अनेक मित्र आहेत. यावेळी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना कोणत्या सेलिब्रिटीच्या घरचे जेवण आवडते ते सांगितले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरचं जेवणं चांगलं असतं हे सांगत त्यांनी तो डायट फॉलो करत नाही हे देखील सांगितले.
महेश मांजरेकर यांना एका मुलाखतीत विचारलं की त्यांना चित्रपटसृष्टीत कोणाच्या घरचं जेवण आवडतं. त्यावर उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाला, "मला सलमानच्या घरच्या जेवणं आवडतं. त्याला मसालेदार जेवणं खूप आवडतं. सलमानविषयी बोलायचे झाले तर त्याला डायटची चिंता नसते, त्याले मसालेदार जेवण आवडतं. त्यामुळेच मला त्याच्या घरचं जेवणं आवडतं. संजय दत्तचं जेवणं कमी मसालेदार असतं. पण सलमानच्या घरी चांगलं असतं."
महेश मांजरेकर म्हणाले की जेव्हा मुंबईत शूटिंग करतात तेव्हा ते आधी हे बघतात की त्याच्या जवळ कोणी चांगला शेफ असेल जो त्यांना घरगुती जेवण बनवून देईल. त्यातही बऱ्याचवेळा संपूर्ण यूनिट त्यांचं जेवण चाखायला व्हॅनमध्ये येतात. त्यांच्या संपूर्ण यूनिटला त्यांच्या घरचं जेवण खायला आवडतं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या शेफला त्यांच्या पत्नीनं शिकवलं होतं. त्यानंतर आईकडून त्यांनी महाराष्ट्रीयन डीश शिकून घेतल्या.
हेही वाचा : Salman Khan नेच ठरवली होती त्याची आणि Sangeeta Bijlani च्या लग्नाची तारिख, पण...
महेश मांजरेकर यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी संजय दत्तच्या 'वास्तव: द रियलिटी', 'कुरुक्षेत्र', 'पिता', 'हथियार', 'रक्त' आणखी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर सलमानच्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चे दिग्दर्शन केले होते. पुढे त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसणार असून तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय, त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी प्रशांत दामले यांच्या ‘एका काळेची मणी’ या कॉमेडी वेब सीरिजची निर्मिती केली होती. तर नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर ते ‘पुराना फर्निचर’मध्ये काम करणार आहेत.