Maherchi Saree Alka Kubal Fees: 'माहेरची साडी' हा चित्रपट आपण अनेकदा पाहिला असेलच. या चित्रपटानं त्याकाळी अक्षरक्ष: इतिहास रचला होता. आजही हा चित्रपट पाहिला जातो आणि विषयी अनेकांनाही कुतूहल आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे माहेरची साडी या चित्रपटाची. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे नावं घेतलं तर समोर येते ती म्हणजे 'माहेरची साडी'. 32 वर्षे होऊन गेली तरी या चित्रपटाची चर्चा होताना दिसते आणि सध्या चर्चा आहे म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वेलची. 'माहेरची साडी 2' येणार यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे अलका कुबल यांनाही अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु त्यांनी मात्र याबद्दल कुठलीच स्पष्टता दिलेली नाही. परंतु या चर्चा तर आहेच परंतु चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की या चित्रपटाच्या वेळी अलका कुबल यांनी किती मानधन घेतले होते?
अलका कुबल, विक्रम गोखले, आशालता वाबगावकर, अंजिक्य देव, रमेश भाटकर, विजय चव्हाण, उषा नाडकर्णी, जयश्री गडकर यांच्या एकाहून एक सरस भुमिका होत्या. आजही मराठी सिनेमांमध्ये अशी स्टारकास्ट पाहायला मिळते परंतु या चित्रपटानं त्यावेळी ही मल्टिस्टाकास्ट प्रचंड गाजली होती. 1991 साली आलेल्या या चित्रपटानं चक्क कोट्यवधींच्या कमाई त्या काळात केली होती. त्यामुळे आजच्या काळाच्या मानानं ही कमाई सर्वाधिक होती. आता मराठी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. सोबत मराठी कलाकारांनाही यामुळे चांगले मानधन मिळते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की, त्याकाळी माहेरची साडी या चित्रपटानं किती पैसे कमावले होते आणि सोबतच अलका कुबल यांनी किती मानधन घेतले होते?
हेही वाचा - ''अन्यथा माझं अस्तित्व संपेल...'' शाहरूख खानच्या डुप्लिकेटचा दावा?
आता चर्चा आहे ती 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधींची कमाई या चित्रपटानं फारच थोड्या अवधीत केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. तेव्हा पाहुया की, आजच्या काळाप्रमाणे 32 वर्षांपुर्वीचा काळ कसा होता. अर्थातच तेव्हा नाटक आणि सिनेमा पाहणारे रसिक मराठी प्रेक्षक होते जे आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांचा अभिनय पाहण्यासाठी कायमच उत्सुक असायचे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी ही फिल्म अलका कुबल यांनी नाकारली होती. परंतु अलका कुबल यांनी या चित्रपटासाठी चक्क त्यांना मिळत असलेल्या मानधनापेक्षा निम्म्याहून कमी ऑफर करण्यात आले होते. अलका कुबल यांचा हा पहिला सिनेमा नव्हता त्यांचा हा 30 वा चित्रपट होता. त्या एका मुलाखतीत सांगितले होते की, विजय कोंडके यांनी मला माझ्या नेहमीच्या मानधनापेक्षा निम्म्याहून कमी मानधन मिळाले होते. मी मानधनाची किंंमत ऐकून तिथून निघाले होते परंतु त्यावेळी त्यांनीच मी लक्ष्मी साकारावी हे ठरवले होते'', अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
परंतु त्यांनंतर त्यांना अनेकांनी सुचावलं की मानधनाची अपेक्षा न करता त्यांनी चित्रपट करावा आणि ही भुमिका त्यांचा चांगलीच ओळख मिळवून देईल.