Diljit Dosanjh Concert Video : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसाझं हा आता फक्त भारतात नाही तर परदेशात देखील लोकप्रिय आहे. दिलजीत हा ग्लोबर सेन्सेशन ठरला आहे, तर त्याचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखोंच्या संख्येनं आहेत. सध्या त्याच्या दिल-इलुमिनाटी या टूरवर आहे. या टुरच्या निमित्तानं तो संपूर्ण भारतात कॉन्सर्ट करताना दिसत आहे. त्याच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रदर्शित होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी एक व्हिडीओ हा त्याच्या एका चाहतीचा रडतानाचा होता. त्यानंतर त्या चाहतीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. हे पाहता दिलजीतनं तिला स्टेजवर बोलून तिला पाठिंबा देत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरही दिलं. अशात आता आणखी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे, दिलजीतनं त्याच चाहतीला आता त्याची G-Wagon ही गाडी भेट म्हणून दिली आहे.
या मुलीनं दिलजीतच्या जयपुरमधील कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. या कॉन्सर्टमधील तिचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिलजीत तिचं आवडीचं गाणं गात असताना त्या तरुणीना तिचे अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याच्या पुढच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीतनं तिला बोलावलं आणि तिला पाठिंबा दिला.
दिलजीत हा त्याच्या चाहतीच्या या ट्रोलिंगवर तिला पाठिंबा देत म्हणाला की फक्त ज्या लोकांना संगीत कळतं त्यांना सगळ्या भावना कळतात. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून इतर अनेक चाहत्यांचा ज्यांना कॉन्सर्टमध्ये अश्रू अनावर झाले त्यांचे व्हिडीओ शेअर केले.
सोशल मीडियावर या सगळ्या ट्रोलिंगमध्ये चर्चा सुरु झाली आहे की दिलजीतनं त्याच चाहतीला त्याची लग्झरीयस G-Wagon ही गाडी भेट दिली आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चा सुरु असताना कोणतीही अधिकृत माहिती ही अजून मिळालेली नाही. ती भेट वस्तू ही चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा : फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला शूटिंगच्या दुसऱ्याच दिवशी केलं श्वानानं Replace; आता 3330 कोटींची मालकीण
दिलजीतच्या या टूरला भारतातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडीओ आपण पाहतोय. तिथे किती गर्दी आहे ते पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर सगळे तिकिटं ही विकली जात आहेत. तर आता त्याचा पुढचा कॉन्सर्ट 29 डिसेंबर रोजी गुवाहाटीला होणार आहे. दरम्यान, G-Wagon या गाडीची किंमत 2.55 कोटी ते 4 कोटी आहे.