दुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई

अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले असून 400 कोटींची कमाई केली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 7, 2024, 12:35 PM IST
दुसऱ्याच दिवशी 'पुष्पा 2'ने रचला इतिहास, मोडले सर्व रेकॉर्ड, केली 'इतकी' कमाई title=

Pushpa 2 Box Office Collection Day 2:  अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. 'पुष्पा 2'  हा चित्रपट 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 400 कोटींचा आकडा गाठला आहे. 

दरम्यान, 'पुष्पा 2'  चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून प्रचंड कमाई केली. तर 'पुष्पा 2' चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी इतकी कमाई करून नवा इतिहास रचला आहे. 

'पुष्पा 2' ने दुसऱ्याच दिवशी गाठला 400 कोटींचा आकडा

ट्रेड एनालिस्ट मनोबाला यांच्या मते, 'पुष्पा 2' चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 282.91 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 134.63 कोटी रुपयांची कमाई केली. 'पुष्पा 2' चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांमध्ये 417.54 कोटींची कमाई केली. जो फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठा विक्रम आहे. 'पुष्पा 2' ने ज्युनियर एनटीआर आणि राम चरणच्या 'RRR' तसेच शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत. राम चरणच्या 'RRR'या चित्रपटाने पहिल्या दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. 

पुष्पा 2ने या चित्रपटांना टाकले मागे

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात लाल चंदनाची तस्करी दाखवण्यात आली होती. तर या चित्रपटातील अल्लू अर्जुनची व्यक्तिरेखा खूपच दमदार होती. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर तीन वर्षांनी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील थिएटर बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी 400 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने  जवान, KGF, कल्की 2898AD तसेच RRR या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत.