Pathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?

Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटावर सगळीकडे बंदी घालण्याची मागणी सुरु आहे. 

Updated: Dec 18, 2022, 02:21 PM IST
Pathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?  title=

Pathaan Controversy: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (deepika padukone) 'पठाण' चित्रपटामुळे सध्या देशभरात नवा वाद उफाळून आलाय. चित्रपटातील 'बेशरम रंग' (besharam rang) हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपने त्याच्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी आता होतेय. या सगळ्यात सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. (Up Cm Yogi) 

व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले की, या देशातील काही कथित लेखक आणि डाव्या विचारसरणीच्या कलाकारांनी आता भाजप नव्हे तर भारतविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. दुर्दैवानं शाहरुख खानसारख्या लोक देखील त्या आवाजाचा एक भाग आहे. (Yogi Adityanath) 

'यूपी तक'नं दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ खरा आहे. मात्र, हा व्हिडीओ आताचा नाही तर नोव्हेंबर 2015 मधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी 2015 मध्ये म्हटले होते. मात्र, पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या व्हिडिओचा चुकीच्या पद्धतीने वापर करून खोटं पसरवण्यात येत आहे. 

चित्रपटावर बंदीवर काय म्हणाला शाहरुख 

कोलकाता येथे पार पडलेल्या 28 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना शाहरुख खानने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शाहरुख खानच्या एका ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरुय.

शाहरुख खानने ट्विटरवर #asksrk या सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यानंतर त्याच्या चाहत्यांची शाहरुखवर प्रश्नांचा भडीमार केलाय. किंग खाननेही आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली आहेत. यावेळी शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला सर अशी कोणती कविता किंवा कोट जो ​​तुमच्या मनात वारंवार येते? असे सवाल केला. 

हेही वाचा : 'पठाण'वरुन वाद सुरु असताना शाहरुख खानचं सूचक ट्विट; सोशल मीडियावर एकच चर्चा

यावर उत्तर देताना शाहरुखने एका कवितेची ओळ लिहीली आहे. 'ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले, ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या," अशा शब्दात शाहरुखने त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं आहे. दरम्यान, 'पठाण' वादाच्या भोवऱ्यात अडकला असताना शाहरुखचे हे ट्विट वाचून त्याच्या चाहत्यांनाही हुरुप आला आहे. (did cm yogi adityanath ask to boycott shahrukh khan s film pathaan know the truth)