वरूणच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने जगभरात आता पर्यंत लाखो नागरिकांचा जीव घेतला आहे. 

Updated: Apr 13, 2020, 03:33 PM IST
वरूणच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण title=

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात आता पर्यंत लाखो नागरिकांचा जीव घेतला आहे. तर १६ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता  संपूर्ण जगात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत.  वरूण देखील व्हिडिओ चॅटद्वारे चाहत्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत जोडलेला आहे.  कुटुंबातील सदस्यांसोबत  नुकताच झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये नातेवाईकांना करोनाची लागण झाल्याचं त्याने सांगितलं.

वरूणची खास मैत्रीण आणि अभिनेत्री  जोया मोरानीाला कोरोनाची लागण झाली आहे. २० मार्च रोजी तिला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला त्याचप्रमाणे खोकला देखील झाला होता. अखेर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. ‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, 'जोपर्यंत अशी परिस्थिती स्वत:वर येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळत नाही.' असं वक्तव्य त्याने यावेळेस केलं. 

शिवाय सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. हिच वाढती संख्या पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा काळ वाढवला आहे. शनिवारी त्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

संपूर्ण जगभरात आतापर्यंत १,६७६,२६५  हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १०३,६६० लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील २०.८ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ३ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.