मुंबई : अभिनेता सुबोध भावेचे दोन सिनेमे आज रिलीज झालेत. हदयांतरसह कडिशन्स अप्लाय हा ही सिनेमा आज रिलीज झालाय. सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे यांच्या मुख्य भूमिका असलेला, गिरीश मोहिते दिग्दर्शित 'कंडिशन्स अप्लाय: अटी लागू'हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लेखक संजय पवार यांचे असून, सिनेमाला अविनाश विश्वजीत यांचं संगीत आहे. कसा आहे कंडिशन्स अप्लाय?.. जाणून घेऊया
'कंडिशन्स अप्लाय : अटी लागू' या सिनेमाची गोष्ट आहे दोन अगदी कॉन्ट्रास्ट व्यक्तिरेखांची. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी, बिन्धास्त, चुलबुली आऱ जे स्वरा ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री दिप्ती देवीनं तर एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजरचं पद सांभाळणारा, आपल्या कामाबद्दल अत्यंत पॅशनेट असणा-या अभयची भूमिका साकारली आहे अभिनेता सुबोध भावंनं. हे दोघंही एकमेकांपासून खूप भिन्न असले तरी दोघांमधला एक धागा समान आहे. या दोघांना स्वातंत्र्य हवं, कुठलीही बंधनं नको, इन शॉर्ट दोघांनाही लग्न करायचं नाहीये. सो फायनली दोघं लिव्ह इऩ रिलेशनशिपमध्ये राहायचं ठरवतात.
स्वरा आणि अभय दोघं लिव्ह इऩमध्ये रहायला सुरु करतात. एका वर्षातच दोघांमध्ये खटके उडू लागतात. पुढे काय घडतं, हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सिनेमाला योग्य ट्रीटमेन्ट दिली आहे. मात्र सिनेमाच्या व्यक्किरेखा हाताळताना, एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर त्यांची बदलत चाललेली मानसिकता, त्यांचे विचार, ही पात्र इतक्या वेगानं स्वत:मध्ये बदल घडवतात की ते पचणं खरंच जड जातं..
या सिनेमाची खरी ताकद आहे यातले संवाद जे लिहिलेत लेखक संजय पवार यांनी. अगदी सिनेमाच्या सुरुवातीच्या सीनपासून शेवटापर्यंत सिनेमातले संवाद खूपच फ्रेश, आजच्या काळातले वाटतात, कुठेही जड वाटत नाही.. कंडिशन्स अप्लाय या सिनेमाची कथाही खूप फ्रेश आहे, नवीन आहे मात्र काही ठिकाणी पटकथा फसलीये. स्वरा आणि अभय या दोन व्यक्तिरेखांमधले अचानक होणारे बदल, हे सिनेमा पाहताना पचत नाही..
कंडिशन्स अप्लाय या सिनेमाचं संगीत ठिकठाक झालंय. सुबोध भावे आणि दिप्ती या दोघांचा अभिनय छान झालाय. गिरीश मोहिते यांचं दिग्दर्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अभिनेता अतुल परचुरे यांचं टायमिंग आणि संजय पवार यांच्या संवादामुळे सिनेमा आणखी रंजकदार वाटतो.. या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता 'कंडिशन्स अप्लाय अटी लागू' या सिनेमाला मिळतायत 3 स्टार्स.