हृदयांतर : नात्यांचा हळुवार प्रवास

प्रसिद्ध फॅशन डिजायनर विक्रम फडणीसचा पहिला मराठी सिनेमा 'हृदयांतर' आज रिलीज झालाय. मुक्ता बर्वे, सुबाध भावे, सोनाली खरे, बाल कलाकार तृष्णिका शिंदे, निष्ठी वैद्या यांची प्रमुख भूमिका असलेला 'हृदयांतर' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. कसा आहे 'हृदयांतर' हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया..

Updated: Jul 7, 2017, 11:02 AM IST
हृदयांतर : नात्यांचा हळुवार प्रवास title=

मुंबई : प्रसिद्ध फॅशन डिजायनर विक्रम फडणीसचा पहिला मराठी सिनेमा 'हृदयांतर' आज रिलीज झालाय. मुक्ता बर्वे, सुबाध भावे, सोनाली खरे, बाल कलाकार तृष्णिका शिंदे, निष्ठी वैद्या यांची प्रमुख भूमिका असलेला 'हृदयांतर' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. कसा आहे 'हृदयांतर' हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी या सिनेमावर एक नजर टाकुया..

खरंतर अभिनेता सुबोध भावे यांचे आज एकच दिवशी दोन, सिनेमे रिलीज झालेत. बॉलिवूडमध्ये असं चित्र आपल्याला क्वचितच पहायला मिळेल, मात्र मराठी इंडस्ट्रीतल्या सुपरस्टार सुबाध भावेचा आज हृद्यांतर आणि कंडिशन्स अप्लाय हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झालेत. विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृदयांतर'मध्ये नात्यांचा हळुवार प्रवास पहायला मिळतोय. बारा वर्ष संसार केल्यानंतर शेखऱ आणि समायरा जोशी जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांनी.

बारा वर्षांच्या संसारानंतर शेखर आणि समायरा या दोघांना आता घटस्फोट हवाय. शेखर आणि समायरा जोशी यांना दोन छान गोड मुली आहेत. समाजापुढे अगदी सुखानं आणि आनंदानं वावरणारे हे दोघं खाजगी आयुष्यात मात्र एकमेकांना कंटाळलेत. याच दरम्यान यांच्या मोठ्या मुलीला एक जीवघेणा आजार डिटेक्ट होतो. यानंतर हे दोघं आपल्या मुलीसाठी का होईना एकत्र येतात, पुढे काय घडतं यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल..

विक्रम फडणीस यांचा हा पहिला मराठी सिनेमा. एका कुटंबाची एक अत्यंत इमोशनल जर्नी 'हृदयांतर' या सिनेमाच्या निमित्तानं रंगवण्याचा प्रयत्न विक्रमनं केलाय. त्यानं सिनेमाला उत्तम ट्रीटमेन्टही दिलीये. सिनेमाचा पूर्वार्ध तुम्हाला ब-यापैकी खिळवून ठेवतो. मात्र उत्तारार्धात सिनेमा जरा ताणला गेलाय.. सिनेमाचा जो मूळ ट्रॅक आहे, त्याचा इम्पॅक्ट पाहणा-यांवर होतोय तरीही त्याच गोष्टीचा अतिरेक होताना दिसतो. जर योग्य ठिकाणी कात्री चालवता आली असती, तर कदाचित सिनेमाची पकड आणखी मजबूत झाली असती.

'हृदयांतर' या सिनेमाची कथा चांगली मात्र इंटरव्हलनंतर सिनेमाची पटकथा जरा भरकटलीये. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे या दोघांचा अभिनय कमाल झालाय. बालकलाकार तृष्णिका आणि निॆष्ठा या दोघींनी छान बॅटिंग केलीये. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतील अभिनेता हृतिक रोशनची एंट्री  अनेकांना सरप्राईज करणारी ठरेल.. तेव्हा 'हृदयांतर' हा एक संपूर्ण फॅमिली एंटरटेनर असून, एकदा तरी हा सिनेमा पहायला हरकत नाही. या सिनेमाला मिळतायत तीन स्टार्स