बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे

Celebs Who got Famous on Television: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटींच्या मानधनाची. त्यातून अनेकांना त्यांनी केलेल्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमुळे अधिक चर्चेत येण्याचे भाग्य त्यांना मिळाले होते. तेव्हा जाणून घेऊया या सर्व सेलिब्रेटींबद्दल. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 18, 2023, 07:55 PM IST
बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे title=
July 18, 2023 | Celebs Who got Famous on Television also took highest fees read the full list (Photo: Zee News)

Celebs Who got Famous on Television: टेलिव्हिजनवरही अनेक सेलिब्रेटींना मोठी फेम मिळाली आहे त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता अशीच एक चर्चा आहे ती म्हणजे त्यांना मिळणाऱ्या मानधनाची. बॉलिवूडमधून मिळणाऱ्या चित्रपटांच्या मानधनापेक्षाही या सेलिब्रेटींना टेलिव्हिजनमधून सर्वाधिक मानधिक मिळते अशी एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेऊया की असे कोणते हिंदी सेलिब्रेटी आहेत असे हे कोणते सेलिब्रेटी आहेत ज्यांना चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधूनच सर्वाधिक मानधन मिळाले आहे. हे सेलिब्रेटी सध्या बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत, ज्यांची चर्चा ही दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत होते. परंतु त्यांच्या टेलिव्हिजनवरच्या मानधनाचा आकडा ऐकलात तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आता सुरूवात करूया अशाच काही सेलिब्रेटींपासून. 

शाहरूख खान

तुम्हाला माहिती नसेल परंतु शाहरूख खानंही एक रिएलिटी शो होस्ट केला होता. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. हा शो म्हणजे 'क्या आप पाचवी पास से तेज हैं?'. या शोमधून शाहरूखनं तगडं मानधन घेतले होते. त्यातून हा रिएलिटी शो हा अमेरिकन शो आहे. 

अमिताभ बच्चन 

बीग बी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिएलिटी शोमधून त्यांना फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय मिळाली होती. त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा होती. गेली 20 हून अधिक वर्षे हा रिएलिटी शो सुरू आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या रिएलिटी शोची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यासाठीही त्यांनी चांगले मानधन घेतले आहे. 

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा ही अभिनेत्री म्हणून आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज केवळ बॉलिवूडचं नाही तर चक्क हॉलिवूडपर्यंत तिनं आपलं नावं कमावलं आहे. परंतु अनेकांना हे माहिती नसेल पण तिनंही खतरों के खिलाडी या रिएलिटी शोचे परीक्षण केले होते. 

अर्शद वारसी

अर्शद वारसी यांनी बिग बॉस हा शो होस्ट केला होता ज्यासाठी त्याला खूप चांगलं मानधन मिळालं होतं. 

आमिर खान 

आमिर खानचा सर्वात गाजलेला रिएलिटी शो तुम्हाला आठवत असेलच? 'सत्यमेव जयते' या रिएलिटी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा शो त्यानंतर बंद झाला परंतु या शोची क्रेझ ही आजही आहे. या शोसाठी त्यानं खसखशीत मानधन घेतले होते. 

शिल्पा शेट्टी 

अर्शद वारसीप्रमाणे शिल्पा शेट्टीनंही बिग बॉसचे होस्टिंग केले होते. त्याचसोबत तिनं यासाठी चांगले मानधन घेतले होते. 

सलमान खान 

बिग बॉस या शोमुळे सलमान खानच्या मानधनाची कायमच चर्चा होताना दिसते. 

अक्षय कुमार 

खतरों के खिलाडी हा रोहित शेट्टीप्रमाणे त्यानं होस्ट केला होता. 

रणवीर सिंग

रणवीर सिंगनंही एक रिएलिटी शो नुकताच होस्ट केला होता. 

कंगना राणौत

कंगना राणौतनं 'लॉक-अप' हा शो होस्ट केला होता.