शशि कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी कलाकारांची हजेरी...

सोमवारी संध्याकाळी दिग्गज अभिनेते शशि कपूर यांचे निधन झाले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 5, 2017, 11:29 AM IST
शशि कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी कलाकारांची हजेरी... title=

मुंबई : सोमवारी संध्याकाळी दिग्गज अभिनेते शशि कपूर यांचे निधन झाले. आपल्या अभिनयाने सुमारे अडीच दशके चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते शशि कपूर यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टी सुन्न झाली आहे. ते ७९ वर्षांचे होते.

शशी कपूर यांचे निधन

शशी कपूर यांच्या निधनाची वार्ता समजताच बॉलीवुडच्या अनेक सितारे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले. ऋषि कपूर तर चक्क शूटिंग सोडून दिल्लीहुन परतले. 

कलाकारांची हजेरी

या प्रसंगी बच्चन कुटुंबिय सर्वात आधी पोहचले. अमिताभ बच्चन आणि शशि कपूर यांचे खास संबंध होते. या दोघांनी 'दीवार', 'सुहाग', 'त्रिशूल' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

त्याचबरोबर करिना कपूर खान, सैफ अली खान यांनी देखील या प्रसंगी हजेरी लावली.