अभिनेते शशी कपूर यांना ट्विटरवरुन मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. ते ७९व्या वर्षांचे होते. 

Updated: Dec 4, 2017, 08:38 PM IST
अभिनेते शशी कपूर यांना ट्विटरवरुन मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली title=

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. ते ७९व्या वर्षांचे होते. 

शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वांनाच एक धक्का बसला. शशी कपूर यांना राजकीय नेत्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता बोमन इराणी, महेश भट, अजय देवगण, जावेद जाफरी, संजय दत्त, आमिर खान, शबाना आझमी, सुश्मिता सेन, क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग, यांच्यासारख्या अनेकांनी शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले