कपूर कुटुंबातील लेकिचा सासरी जाच; गरोदरपणात झाली मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल

लग्न झालं, काही वर्षांचा संसार सुखाचा झाला. पण, पुढे तिच्या वैवाहिक जीवनात असं काही वादळ आलं, की ...

Updated: Feb 28, 2022, 03:04 PM IST
कपूर कुटुंबातील लेकिचा सासरी जाच; गरोदरपणात झाली मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कपूर कुटुंब हे हिंदी चित्रपट जगतातील काही नामवंत कुटुंबांपैकी एक. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेची या कुटुंबात कमतरता नाही. कायमच हेवा वाटणाऱ्या अशा या कुटुंबात भर पडत हा वटवृक्ष चांगलाच विस्तीर्ण झालेला आहे. अशाच या कुटुंबातील एक लाडाची लेक मोठ्या आशेनं, नव्या संसाराची स्वप्न पाहात सासरी गेली. 

लग्न झालं, काही वर्षांचा संसार सुखाचा झाला. पण, पुढे तिच्या वैवाहिक जीवनात असं काही वादळ आलं, की सर्वांनाच हादरा बसला. 

कपूर कुटुंबातील ही लेक म्हणजे अभिनेत्री करिष्मा कपूर. 2006 मध्ये करिष्माचं लग्न संजय कपूर या व्यावसायिकाशी झालं. पण, आपण घरगुती हिंसेचा शिकार झाल्याचा खुलासा करिष्मानं घधटस्फोटानंतर केला आणि एकच खळबळ माजली. 

आपल्याला मारहाण झाल्याच्या अनेक प्रसंगांची वाच्यता तिनं न्यायलयीन सुनावणीत केली होती. 

गरोदरपणातही आपल्याला मारहाण झाल्याचं तिनं सांगितलं होतं. पतीच नव्हे तर सासूकडूनही मारहाण झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं केला होता. 

कपूर कुटुंबासाठी सुद्धा ही एक गंभीर बाब ठरली. करिष्माला सामना करावी लागलेली परिस्थिती सर्वांच्या कानी गेली आणि ऐकणाऱ्य़ांच्या भुवया उंचावल्या. 

संजय आणि त्याच्या आईकडून मिळणारी वागणूक पाहता अखेर 10 वर्षांनंतर ही जोडी या नात्यातून विभक्त झाली. करिष्माला या नात्यातून दोन मुलं आहेत. 

दोन्ही मुलांचं संगोपन करिष्मा एकटीच करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर संजयनं मात्र करिष्मानंतर आपली जोडीदार निव़डत आयुष्याचा गाडा पुढे लोटला आहे.