'मला तुम्ही दोघं कशाला उगाच...', अन् अभिनेत्रीने अमिताभ आणि जया बच्चन यांना सुनावलं; 'उगाच लहान मुलांसारखे...'

बॉलिवूड अभिनेत्री फरीदा जलाल यांनी अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन आणि जया प्रदा जेव्हा नात्यात होते तेव्हा फरीदा अनेकदा त्यांच्यासह डेट्सवर जात असत.   

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2024, 04:43 PM IST
'मला तुम्ही दोघं कशाला उगाच...', अन् अभिनेत्रीने अमिताभ आणि जया बच्चन यांना सुनावलं; 'उगाच लहान मुलांसारखे...' title=

बॉलिवूड अभिनेत्री फरीदा जलाल यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे. गेल्या अनेक काळापासून त्या बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संजय लिला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' वेबसीरिजमध्येही त्या शेवटच्या दिसल्या होत्या. आपल्या एका मुलाखतीत फरीदा जलाल यांनी बॉलिवूडमधील आपल्या जुन्या दिवसांमधील आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्यासंबंधी आठवणीही सांगितल्या आहेत. 

फरीदा जलाल यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्यात चांगली मैत्रीदेखील झाली. जेव्हा अमिताभ आणि जया नात्यात होते तेव्हा फरीदा जलाल अनेकदा त्यांच्यासोबत जात असतं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या अमिताभ आणि जया यांच्यासह ताज हॉटेलमध्ये डेट्सवर जात असत. तसंच लॉग ड्राईव्हचाही आनंद लुटत असत. 

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत फरीदा जलाल यांनी सांगितलं की, "मी पाली हिलमध्ये आणि अमितजी जुहूमध्ये राहत असत. त्यांचं लग्न होणार होतं. दोघांमध्ये कोर्टशिप सुरु होती आणि सामान्य जोडप्याप्रमाणे भांडत असत. अमितजी रात्रीच्या वेळी स्वत: गाडी चालवायचे. यावेळी जया त्यांच्या शेजारी आणि मी मागे बसत असे. मी त्यांना म्हणायची, मला तुम्ही कबाब मै हड्डी का बनवत आहात".

फरीदा यांनी सांगितलं की, आपण त्यांना कॉफीसाठी सोबत नेत जाऊ नका अशी विनंती केी होती. कारण रात्री उशीर व्हायचा. "मी लवकर झोपणाऱ्यांपैकी आहे, पण तरीही ते मला बोलवायचे. ते नेहमी भांडायचे, आणि मी पाहत राहायचे. जया रडायची आणि ते तिला मनवायचे. मला ते क्षण फार आवडायचे. जयासोबत माझी मैत्री फार जुनी आहे. मी प्रेमाने तिला जिया बोलावते. कॉफी डेटवरुन परतताना ते चित्रपटांबद्दल गप्पा मारायचे. यानंतर ते मला घऱी सोडून आपल्या घरी जात असत. मी इतकंच सांगेन की, ते फार प्रेमळ आहेत. त्यांनी मला आणि गुलजार साहेबांना आपल्या लग्नात बोलावलं होतं. इंडस्ट्रीतील दुसरं कोणीही तिथे नव्हतं".

अमिताभ-जया यांच्यात भांडणं होत असली तरी ती फार गंभीर नसायची असंही त्यांनी स्पष्ट केलं. "अनेकदा क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात भांडणं होत असत. ती कारणं मी सांगू शकत नाही. पण ते लहान मुलांप्रमाणे भांडायचे. ते काही वाईट नाही बोलायचे. प्रेमाच्या गोष्टी बोलत असत. जया लवकर नाराज व्हायच्या ना". फरीदा जलाल यांनी 1960 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.