...म्हणून भाईजानने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

सलमानचा न्यायालयीन फेरा सुरुच 

Updated: Sep 27, 2018, 04:46 PM IST
...म्हणून भाईजानने घेतली सुप्रीम कोर्टात धाव title=

मुंबई: आयुष शर्मा आणि वरिना हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘लव्हयात्री’ या चित्रपटाच्या वाटेत येणाऱ्या अडचणी पाहता आता चित्रपटाचे निर्माते थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा आपल्या हाती घेतलेल्या सलमान खानने आपल्याला येत असणाऱ्या धमक्यांविरोधात सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला असून, सदर प्रकरणी दाद मागितली आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा या प्रकरणी सुनावणी करणार असून, आता त्याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यापुर्वीच त्याच्या वाटेत अनेक अडचणी आल्याचं पाहायला मिळत आहे.

बिहारमध्ये या चित्रपटात दाखल करण्यात आलेली एफआयआर आणि गुजरातमध्ये दाखल करण्यात आलेल तक्रार पाहता या चित्रपटाच्या वाट्याला असलेली संकटं वाढत गेली.

विश्व हिंदू परिषदेने या चित्रपटाच्या लव्हरात्री या नावाला विरोध करत चित्रपटामुळे नवरात्रोत्सवाच्या सणाचा चुकीचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचत असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर या चित्रपटाच्या नावात बदल करत लव्हयात्री असं नाव ठेवण्यात आलं.

प्रदर्शनापूर्वीच येणारे हे अडथळे आणि एकंदर परिस्थितीवर आता सुप्रीम कोर्टाकडून काय सुनावणी करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.