फातिमा सना शेखचं 'या' अभिनेत्यासोबत अफेअर?

कोण आहे हा अभिनेता 

फातिमा सना शेखचं 'या' अभिनेत्यासोबत अफेअर?  title=

मुंबई : 'दंगल गर्ल' फातिमा सना शेख गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. फातिमा लवकरच आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये दिसणार आहे. आजच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शुटिंगमुळे आमीर खान आणि फातिमा खूप जवळ आल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर या दोघांनी अफवा असल्याचं सांगितलं. यानंतर फातिमाचं अजून एका अभिनेत्यासोबत नाव जोडलं गेलं आहे. 

फातिमाच्या अफेअरची चर्चा सध्या तिचा रिल लाइफ भाऊ अपराशक्ती खुरानासोबत असल्याच म्हटलं जात आहे. 'दंगल' सिनेमात फातिमाच्या भावाच्या भूमिकेत अपारशक्ती होता. एक असा भाऊ जो आपल्या बहिणींसाठी खूप मार खातो. अनेकदा फातिमा आणि अपारशक्ती एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यानंतर अशा चर्चा रंगल्या की हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र याबाबत अपारशक्तीला विचारण्यात आलं की, नेमकं तुमचं काय सुरू आहे. त्यावर अपारशक्ती म्हणाला की, आम्ही दोघं आपापल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहोत. जेव्हा आम्ही परतलो तेव्हा भेटण्याचा प्लान केला.

अपारशक्ती आताच रिलीज झालेल्या 'स्त्री' या सिनेमात दिसला. अपारशक्तीसोबत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने आतापर्यंत 120 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर फातिमा सना शेख 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आमीर खान, अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफसोबत फातिमा स्क्रीन शेअर करत आहे.