अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा

यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या.

Updated: Jul 18, 2019, 04:35 PM IST
अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रेलियाने (Gabriella Demetriades) एका मुलाला जन्म दिला आहे. 

बुधवारी गॅब्रेलियाला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अर्जुनसोबत त्याच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिकादेखील होत्या. दिग्दर्शिक जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ताने सोशल मीडियावर अर्जुनला सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. 

अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर जेसिका यांना दोन मुली आहेत. अर्जुनने १९९८ मध्ये मेहर जेसिकासोबत लग्न केलं होते. मात्र, २८ मे २०१८ मध्ये दोघांनी आपलं २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला.

गेल्या वर्षापासून अर्जुन आणि गर्लफ्रेंड गॅब्रेलिया एकत्र राहत असल्याची चर्चा आहे. आता हे दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अर्जुन आणि गॅब्रेलियाची २००९ मध्ये आयपीएलच्या आफ्टर पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 

काही दिवसांपूर्वी अर्जुनच्या दोन्ही मुलींनी त्यांच्या वडिलांचं हे नातं स्वीकारलं असल्याचं सांगितलं होतं.