'बिग बॉस मराठी'चा पहिला एपिसोड या दिवशी

रिअॅलिटी शोमध्ये हिट ठरलेला बिग बॉस शो आता मराठीत येत आहे. या शोला सुरूवातीपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा शो कोण होस्ट करणार याची चर्चा रंगली असताना ते नाव घोषित करण्यात आलं. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी 'बिग बॉस'चे होस्ट होणार आहेत. हिंदी 'बिग बॉस' चा होस्ट सलमान खान लोकांचा फेवरेट आहे, महेश मांजरेकरांना ही लोकप्रियता मिळते का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 3, 2018, 11:25 AM IST
'बिग बॉस मराठी'चा पहिला एपिसोड या दिवशी  title=

मुंबई : रिअॅलिटी शोमध्ये हिट ठरलेला बिग बॉस शो आता मराठीत येत आहे. या शोला सुरूवातीपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा शो कोण होस्ट करणार याची चर्चा रंगली असताना ते नाव घोषित करण्यात आलं. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी 'बिग बॉस'चे होस्ट होणार आहेत. हिंदी 'बिग बॉस' चा होस्ट सलमान खान लोकांचा फेवरेट आहे, महेश मांजरेकरांना ही लोकप्रियता मिळते का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या १५ एप्रिपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होत आहे. यामध्ये कोणकोणते मराठी कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होतील याची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ‘बिग बॉस’च्या घरात येणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र बाकी कोणत्याही स्पर्धकांची नावे समोर आलेली नाहीत. पण आता लवकरच यावरील पडदा उठणार आहे. 

15 एप्रिल रोजी हा शो संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. आणि त्यानंतर सोमवार ते शनिवार हा शो दररोज रात्री 9.30 वाजता असणार आहे. 

Image may contain: 1 person

हिंदीनंतर कन्नड, तामिळ आणि तेलगु भाषांमध्येही 'बिग बॉस' कार्यक्रम करण्यात आला होता. दक्षिणेत ज्यु. एनटीआर, कमल हासन आणि सुदीप यांनी बिग बॉसचं होस्टिंग केलं होतं. मराठी बिग बॉसचं शूटिंग लोणावळ्याला होणार आहे.