ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 10, 2024, 01:19 PM IST
ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...' title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' ची फायनलिस्ट ठरलेली अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी पती विकी जैनसोबत फिरायला गेल्याचे सोशल मीडियावर पाहिले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहिले. आता अंकितानं सोशल मीडियावर सुरु असलेल्या निगेटिव्हिटीला पाहता इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं आहे. अंकिता लोखंडेचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अंकितानं स्पष्ट केलं की बिग बॉसमधून परत आल्यापासून सगळं विस्कळीत असं सुरु आहे. तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी या बदलल्या आहेत आणि त्यावर ती या सगळ्याचा खूप विचारही करू लागली होती. त्यामुळे तिनं हा निर्णय घेतला आहे. 

अंकिताचं म्हणणं आहे की ती आधी अशी नव्हती. त्यासोबतच विकीसोबतच्या तिच्या नात्यावर अंकितानं स्पष्ट म्हटलं की कोणी काहीही म्हणाली तर आम्ही दोघं एकत्रच राहणार. त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या वाटतं नाहीत. अंकितानं सेलिब्रिटी फोटोग्राफर इंस्टंट बॉलिवूडशी बोलत असताना सांगितलं की बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडल्यानंतर या सगळ्या गोष्टी पाहते तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप स्ट्रेसफुल होत आहेत. यापेक्षा चांगलं तर मी घरात होते. बाहेर काय व्हायचं ते मला कळायचं नाही. त्यामुळेच मी इन्स्टाग्राम अनइन्स्टॉल केलं आहे. आमच्यासाठी हेच चांगलं आहे की मी आणि विकी एकत्र आहोत आणि बाकी कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही.  

सासूविषयी बोलताना अंकिताचा मोठा खुलासा

अंकितानं इंडियन एक्सप्रेसला नुकतीच मुलाखत दिली, यावेळी अंकिता म्हणाली माझ्या सासूचा माझ्याविषयी काहीही वाईट बोलण्याचा हेतू नव्हता. मी या लोकांसोबत राहिले आहे. ते माझ्यावर किती प्रेम करतात हे मला माहित आहे. माझी सासू अगदी माझ्यासारखीच आहे, ती जे आहे ते तोंडावर बोलते, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता.

हेही वाचा : ...अन् धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी बदललं नाव?

पुढे अंकिता म्हणाली, 'मी आमच्या आईंची कोणतीही मुलाखत पाहिली नाही कारण ती कशी आहे हे मला माहीत आहे. मी इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले नाही, असे त्या म्हणाल्या. जे खरं आहे तेच मी सांगते.जेव्हापासून ती घरी परतले. तेव्हापासून घरातील वातावरण पूर्णपणे सामान्य आहे. मला कोणीही प्रश्न विचारले नाही.'