Mithun Chakraborty : बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जातं की मिथुन यांना कोलकातामध्ये असलेल्या अपोलो या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, मिथुन त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बातमीनंतर मिथुन यांचे चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते 73 वर्षांचे आहेत. शनिवारी म्हणजे आज 10 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना ICU मध्ये अॅडमिट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याशिवाय त्यांचा MRI करण्यात आल्याचं म्हटलं आहे. न्यूरोलॉजिस्ट संजय भौमिक आणि देबब्रता चक्रबर्ती हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याशिवाय मिथून चक्रवर्ती यांनी त्यांच्या शरीराचा उजवा भाग सुन्न झाल्याचे म्हटले. तर रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्ट्रोक देखील असू शकतो.सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता त्यांची तब्येत कशी आहे याविषयी कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
मिथुन चक्रवर्ती यांना नुकतंच पद्म भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पद्म भूषण मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की "हा पुरस्कार मिळाल्यानं मला फार आनंद होतं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काही मागितली नाही. काही न मागता जेव्हा आपल्याला काही मिळतं त्याचा आनंदा हा शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला खूप आनंद झाला. इतकं प्रेम आणि सन्मान देण्यासाठी सगळ्यांचे आभार. मला मिळालेल्या या पुरस्काराला मी माझ्या चाहत्यांना डेडिकेट करतो. हा अवॉर्ड जगभरात असलेल्या माझ्या चाहत्यांसाठी आहे आणि मी त्यांचे आभार मानतो. ज्यांनी मला खूप प्रेम दिलं. त्यामुळे माझा हा पुरस्कार सगळ्या चाहत्यांना जातो."
हेही वाचा : ...अन् धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी बदललं नाव?
मिथून चक्रवर्ती यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या Kabuliwala या बंगाली चित्रपटात ते दिसले होते. तर 2022 मध्ये त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी माजी IAS अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता.