'Animal' मध्ये रश्मिका मंदान्नाची एंट्री; रणबीरसोबत करणार रोमान्स

रश्मिका मंदान्ना ही एक सुप्रसिद्ध दक्षिणेकडील अभिनेत्री आहे. 

Updated: Jun 30, 2022, 08:08 PM IST
'Animal' मध्ये रश्मिका मंदान्नाची एंट्री; रणबीरसोबत करणार रोमान्स title=

मुंबई : रश्मिका मंदान्ना ही एक सुप्रसिद्ध दक्षिणेकडील अभिनेत्री आहे. मात्र अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा - द राइज' चित्रपटातील 'श्रीवल्ली' या पात्राने रश्मिकाला रातोरात सुपरस्टार बनवलं. पुष्पानंतर आता रश्मिकाची फॅन फॉलोइंगही चांगलीच वाढली आहे.

तिला पुन्हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहते बेचैन झाले आहेत आणि या अस्वस्थतेच्या काळात रश्मिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रश्मिका मंदान्नाला रणबीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल'साठी निवडण्यात आलं आहे. खुद्द रश्मिकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, 'पुष्पा'मधील माझं काम पाहून 'एनिमल'च्या निर्मात्यांनी मला या चित्रपटासाठी संपर्क केला. या चित्रपटाला हो म्हणण्यापूर्वी मी विचारही केला नव्हता, कारण मला विश्वास होता की प्रेक्षकांना माझा नवा लूक पाहायला मिळेल.

रणबीर कपूरसोबत अनिल कूपर देखील 'एनिमल'मध्ये दिसणार आहेत. याचा एक व्हिडिओ पोस्टरही जारी करण्यात आलं आहे. रणबीर कपूर आणि कबीर सिंग निर्माते संदीप रेड्डी वंगा 'एनिमल'च्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर रणबीर कपूर चित्रपटात एका गडद भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.