जया बच्चन यांचं नाव घेताच बिग बींनी व्यक्त केली मनातील भीती

अमिताभ यांनी खुलासा केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 12, 2022, 12:19 PM IST
जया बच्चन यांचं नाव घेताच बिग बींनी व्यक्त केली मनातील भीती title=

मुंबई : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 14) चे सुत्रसंचालन करत आहेत. यावेळी स्पर्धकांशी बोलताना अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही अनेक खुलासे करतात. यावेळी अमिताभ यांनी खुलासा केला की एक जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या कोणत्या गोष्टीची भीती वाटते ते सांगितले आहे. 

'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये जेव्हा स्पर्धकानं अमिताभ यांना जया यांच्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा बिग बीं म्हणाले, 'ते कधीच जया यांचा कॉल मिस करत नाही आणि जर त्यांनी कधी चुकून मीस केला तर त्यांना खूप भीती वाटते...' अमिताभ यांनी कॉल रिसिव्ह केला नाही तर जया बच्चन यांनी ओरडतात. (amitabh bachchan says jaya bachchan becomes angry when he misses her phone calls on kbc 14) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांविषयी देखील सांगितले. स्पर्धकांसोबत गप्पा मारताना बिग बींनी त्यांच्या कॉलेजच्या टोपणनावाबद्दल सांगितले. अमिताभ म्हणाले, की मुली त्यांना उंट बोलायच्या. नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये ते बोमन इराणी, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्यासोबत दिसत आहेत.