VIDEO : अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीसोबत क्रिकेट खेळताना दिसला अरहान; तिसऱ्याच बॉलमध्ये केलं क्लिन बोल्ड

Arhaan Khan Plyaing Cricket With Sshura Khan : अरहान खान आणि शुरा खानचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 25, 2024, 06:18 PM IST
VIDEO : अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीसोबत क्रिकेट खेळताना दिसला अरहान; तिसऱ्याच बॉलमध्ये केलं क्लिन बोल्ड  title=
(Photo Credit : Social Media)

Arhaan Khan Plyaing Cricket With Sshura Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची पत्नी शूरा खान आणि त्यांचा मुलगा अरहान खान यांच्यात किती चांगलं नातं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अरबाज आणि मलायका मिळून अरहानची को-पेरेंटिंग करतात. शूरासोबत अरहानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओमध्ये अरहान आणि शुरा क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शुरा आणि अरहान दोघे बिल्डिंगच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसत आहे. अरहान आणि शुराची बॉन्डिंग सगळ्यांना माहित आहे. दरम्यान, त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, 'IPL पाहण्यापेक्षा हे पाहण्यात जास्त मज्जा आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'टॉम अॅन्ड जेरी जसे खेळतात त्यासारखं हे दिसतंय.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जेव्हा केव्हा पाहिलं तेव्हा हे दोघे सोबत दिसतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मलायका बोलत असेल कसा मुलगा आहे हा.' आणखी एक नेटकरी म्हणाला की, 'काही बोलायला गेलो तर सलमान भाईला राग येईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अरबाज आणि शूराच्या लग्नानंतर सगळीकडे त्यांच्या कुटुंबावरून सतत चर्चा होती. दरम्यान, त्या दोघांच्या लग्नात अरहाननं हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यानं त्याचे वडील अर्थात अरबाजच्या आयुष्यात आलेल्या शुरासोबत फोटो देखील काढला. त्यांचे संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असं म्हटलं जातं की अरहाननं अरबाज आणि शुराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सलमान खानच्या चित्रपटातील 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे गाणं गात सगळ्यांचं स्वागत केलं.'

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांना कसा वाटला अभिषेकचा I Want To Talk? रिव्ह्यू शेअर करत म्हणाले, 'गरजेनुसार...'

दरम्यान, इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं सांगितलं की अरहान तेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल जेव्हा त्याला वाटेल की तो त्यासाठी तयार आहे. आशा आहे की एक-दोन वर्षात तो इंडस्ट्रीत काम करण्यासाठी सज्ज होईल. मला विश्वास आहे की तो कोणतंही काम करण्या आधी एक कलाकार म्हणून काम करणार आहे.