अमिताभ बच्चन 'या' अभिनेत्याचे सर्व चित्रपट पाहतात, म्हणतात 'मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं'

अमिताभ बच्चन यांनी 'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेत्याचे खूप कौतुक केले आहे. या अभिनेत्याचे सर्व चित्रपट मी पाहतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकतो असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 27, 2024, 07:26 PM IST
अमिताभ बच्चन 'या' अभिनेत्याचे सर्व चित्रपट पाहतात, म्हणतात 'मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं' title=

Amitabh Bachchan: बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील अमिताभ बच्चन हे वयाच्या 81 व्या वर्षी देखील काम करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे 'कल्की 2898 एडी' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसले होते. सध्या अमिताभ बच्चन हे 'कौन बनेगा करोडपती 16' या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकतेच त्यांनी KBC च्या सेटवरून 'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेत्याचे कौतुक करत त्यांनी त्या अभिनेत्याचे सर्व चित्रपट मी बघत असतो असं म्हटलं आहे. 

'KBC 16'मध्ये  बिग बींनी विचारला पंकज त्रिपाठी यांच्याबद्दलचा प्रश्न

KBC 16 च्या भागामध्ये अमिताभ बच्चन यांनी 'स्त्री 2'मधील अभिनेता पंकज त्रिपाठीबद्दल एक प्रश्न विचारला होता. बिग बींनी पारस मणी नावाच्या स्पर्धकाला 20,000 रुपयांसाठी हा प्रश्न विचारला होता. पंकज त्रिपाठीने 'मैं अटल हूँ' चित्रपटात खालीलपैकी कोणती भूमिका साकारली आहे? यामध्ये त्यांना स्पर्धकाला चार पर्याय दिले होते. ज्यामध्ये सेलर, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि क्रिकेटर. योग्य उत्तर पंतप्रधान होते. 

अमिताभ बच्चन यांच्याकडून पंकज त्रिपाठीचं कौतुक 

अमिताभ बच्चन यांनी पंकज त्रिपाठीचं भरभरून कौतुक केलं. म्हणाले की, पंकज त्रिपाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सक्षम कलाकार आहेत. तो खूप चांगला कलाकार आहे. आम्ही त्याचे जास्तीत जास्त चित्रपट पाहतो आणि चित्रपटांमधून शिकतो. त्याची कला खूप चांगली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'स्त्री 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 12 दिवसांमध्ये देशात 422 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 589 कोटींची कमाई केली आहे.