Amitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण

Amitabh Bachchan's Grand Daughter Navya Naveli Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदानं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण केलं आहे. तिनं सोशल मीडियावर तिच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: May 12, 2023, 04:34 PM IST
Amitabh Bachchan यांच्या नातीचं ग्लॅमरच्या जगतात पदार्पण title=
(Photo Credit : Navya Naveli Nanda Instagram)

Navya Naveli Nanda : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची लेक नव्या नवेली नंदा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. चित्रपटसृष्टीपासून नव्या लांब राहत असली तरी नेहमीच ती चर्चेत असते. दरम्यान, नव्याची लोकप्रियता पाहता एका नावाजलेल्या मेकअप ब्रॅंडनं तिला जाहिरातीसाठी कास्ट केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की नव्याला कोणत्या ब्रॅंडनं जाहिरातीसाठी कास्ट केलं. तर L'Oreal ब्रँडच्या जाहिरातीत नव्या दिसली आहे. एकीकडे नव्याचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे नव्या ट्रोलिंगचा शिकार झाली आहे. 

नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या जाहिरातीत नव्या सुंदर दिसत असून तिनं सुंदर अभिनय केला आहे. अमिताभ यांची नात असलेली नव्या सोशल मीडियावर या जाहिरातीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नव्यानं कॅप्शन दिलं आहे की 'Glowing with the Glycolic Bright Serum by L’Oréal Paris' असे कॅप्शन दिले आहे. तिची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. नव्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत तिचा मामा आणि अभिनेता अभिषेक बच्चननं रेड हार्ट इमोजी वापरलं आहे. तर तिची आई श्वेता बच्चननं हॅलो ब्युटी असं म्हटलं आहे. नव्याच्या या जाहिरातीवर सोनाली बेंद्रेपासून अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिची स्तुती केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नव्या ही अमिताभ बच्चन यांची नात असून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. नव्या एक सोशल वर्कर एनजीओ चालवते आणि खूप कमी वयात नव्यानं अनेक गोष्टी केल्या आहेत. ज्या पाहून आजोबा अमिताभ बच्चन ते आई श्वेता बच्चनपर्यंत सगळ्यांना गर्व होईल. श्वेतानं ग्लॅमरस जगात येण अनेकांना आवडलेलं आहे. त्यावर कतमेंच कर नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. अनेकांनी कमेंट करत सांगितले की तिला असं अनेक जाहिराती आणि चित्रपट-वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी उस्तुक आहे. पण अनेकांना तिचं असं ग्लॅमरच्या जगात येणं आवडलेलं नाही. 

हेही वाचा : Aishwarya Rai ची लेक आराध्याशी महिमा चौधरीच्या मुलीची तुलना? 'या' गोष्टीमुळे होतेय चर्चा

एक नेटकरी कमेंट करत नव्याला ट्रोल करत म्हणाला, व्वा, हे मस्त आहे. मामी आणि भाची दोघी एकाच ब्रँडच्या ब्रॅंड अम्बॅसिडर. दुसरा नेटकरी म्हणाला, हे कसं शक्य झालं आणि तू या ब्रँडची जाहिरात का केलीस? ही जाहिरात करून तुला काय मिळालं? तुम्ही घराणेशाहीतील लोकांना सगळंच असं हातात मिळतं.