Amitabh Bachchan 80th Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत आणि या खास प्रसंगी त्यांचे काही किस्से समोर आले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) संस्थापक आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे बॉलीवूड (Bollywood) कलाकारांशी घट्ट नाते आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतचे त्यांचे नाते काही खास होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीच बिग बींना दुसरा जन्म दिला होता. याचा खुलासा करताना खुद्द अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांशी संबंधित किस्सा सांगितला होता. (Amitabh Bachchan 80th Birthday)
अमिताभ यांच्या 'कुली' (coolie) चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. फाईटिंग सीन शूट करताना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. पण, त्या दिवशी मुंबईत (Mumbai) जोरदार पाऊस सुरु होता आणि रुग्णवाहिका त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. सर्व जण चितेंत होते. अशा परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे मदतीसाठी पुढे आले. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अमिताभ यांनी हा किस्सा सांगितला होता.
त्यावेळी बिग बींच्या मदतीसाठी त्यांनी शिवसेनेची अॅम्ब्युलन्स पाठवली आणि त्यांना वेळीच रुग्णालयात नेण्यात आलं. खुद्द अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. 'बाळासाहेब ठाकरेंनी मला जेव्हा गरज होती तेव्हा मला मदत केली. त्या वेळी त्यांनी मला मदत केली नसती तर आज मी जिवंत राहिलो नसते, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. तसेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले की, ठाकरे कुटुंबाशी माझे कौटुंबिक नाते आहे. बाळासाहेबांच्या कुटुंबासोबत आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे जगलो आहोत.
"जया आणि माझे लग्न झाले तेव्हा बाळासाहेबांनी मला बोलावले होते. मी त्यांना भेटायला पोहोचलो तेव्हा ते म्हणाले, की तुझं लग्न झालंय, तू तुझ्या बायकोला घेऊन घरी ये. मी त्यांच्या घरी गेलो आणि माईंनी जयाचे त्यांच्या घरी असे स्वागत केले की, जणू त्यांचीच सून घरी आली होती. तेव्हापासून ठाकरे कुटुंबाशी आमचे कौटुंबिक नाते आहे. मला त्यांची आपुलकी, आदर, प्रेम याची कायम आठवण राहील. आम्हाला आयुष्यात कधी कधी असं वाटलं की आम्हाला त्यांच्याकडून थोडी प्रेरणा घ्यायची आहे तेव्हा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचो आणि ते आमचा हात धरून आम्हाला मार्गदर्शन करायचे," असे अमिताभ यांनी सांगितले होते.