अमिताभ यांचा अपघात ही अफवा....

 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एका अपघातातून बचावले, असे वृत्त काल प्रसिद्ध झाले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 17, 2017, 04:41 PM IST
अमिताभ यांचा अपघात ही अफवा....  title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एका अपघातातून बचावले, असे वृत्त काल प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर मात्र त्याबद्दलच्या चर्चाना उधाण आले. मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द बीग बीं केला आहे. 
फेसबुकवरून अमिताभ यांनी आपल्या फॅन्सला संदेश दिला की, "माझा अपघात झाला नव्हता. मी एकदम ठीक आहे."

काही दिवसांपूर्वी बिग बी कोलकत्ता येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल च्या उद्घाटनासाठी गेले होते. शनिवारी ११ नोव्हेंबरला एअरपोर्ट वर जात असताना त्यांच्या मर्सिडिज कारचा मागचा टायर निखळयामुळे अपघात झाला आणि त्यातून अमिताभ बचावले, असे वृत्त प्रकाशित झाले होते. 

मात्र ही बातमी चुकीची असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जाहीर केले. त्याबद्दल अमिताभ म्हणाले की, "काही मित्रांनी आणि चाहत्यांनी मला अपघातातून बचावलो म्हणून शुभेच्छा देत आहेत. मीडियाकडून त्यांना माझा अपघात झाला आणि त्यातून मी बचावलो, असे कळले आहे. मात्र हे खरे नाही. मी ठीक आहे. माझा अपघात झालेला नाही. मात्र तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा कायम अशाच राहू दे."