बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का?

पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात एका स्टारची जोरदार चर्चा आहे. 

Updated: Feb 5, 2022, 08:31 PM IST
बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का? title=

मुंबई : पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात एका स्टारची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने सगळ्या भाषांमध्ये भरपूर कमाई केली आणि कलेक्शनचे सगळे रेकॉर्डही तोडले. आता या स्टारची बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी कसरत सुरू आहे. कदाचित तुम्हाला समजलं असेल की आम्ही कोणत्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अल्लू अर्जुन आहे. अल्लू अर्जुन स्टायलिश स्टार म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

39 वर्षीय अल्लू अर्जुन तेलगू चित्रपटांचा नायक असून तो दक्षिणेतील सगळ्यात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत येतो. डान्स असो वा एक्शन, रोमान्स असो की मग कॉमेडी, अभिनयाच्या प्रत्येक कौशल्यात तो अतुलनीय आहे. अल्लू अर्जुनने 2003 मध्ये 'गंगोत्री' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. 2004 च्या आर्या सिनेमामधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. ज्याचे दिग्दर्शक सुकुमारयांनी केलं आहे. अल्लूच्या पुष्पा सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे.

अल्लू अर्जुनचं फिल्मी करिअरही खूप धमाकेदार आहे. त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीत 'आर्या 2', 'वेदम, 'जुलै', 'रेस गुरम', 'सन ऑफ सत्यमूर्ती', 'सरायनोडू', 'अला वेंकंथापुरुमुलू' आणि 'पुष्पा: द राइज या सिनेमाचा समावेश आहे.' अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी लग्न केलं. त्याला दोन मुलंही आहेत.