तुरुंगातून सुटताच 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाला अल्लू अर्जून; म्हणाला, 'मी त्या कुटुंबाला...'

Allu Arjun React On His Arrest And Bail: अल्लू अर्जून याची अटक आणि जामीन यामुळं देशात सध्या एकच चर्चा रंगली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 15, 2024, 01:31 PM IST
तुरुंगातून सुटताच 'त्या' घटनेवर पहिल्यांदाच व्यक्त झाला अल्लू अर्जून; म्हणाला, 'मी त्या कुटुंबाला...' title=
Allu Arjun Breaks Silence First Time Since Arrest And Bail In Pushpa 2 Stampede Death

Allu Arjun React On His Arrest And Bail: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या संध्या थेटरमध्ये पुष्पा-2 द रूलच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली होती. मात्र, आज सकाळी अल्लू अर्जूनची सुटका करण्यात आली आहे. कोर्टाने जामीनावर त्याची सुटका केली आहे. 

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर एकच खळबळ उडाली होती. कोर्टाने त्याला 14 दिवसांच्या कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. तिथे तेलंगणा उच्च न्यायालयाने 50,000 रुपयांच्या जातमुचकल्यावर त्याला अंतरिम जामीन सुनावण्यात आला. मात्र तरीही एक रात्र त्याला जेलमध्येच काढावी लागली होती. 

शनिवारी 14 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला तुरुंगात सोडण्यात आले. त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाददेखील साधला होता. त्याच्या घराजवळ जमलेल्या चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केले तरंच, चाहत्यांना धन्यवाददेखील दिले. या घटनेवर पहिल्यांदा अल्लू अर्जुन व्यक्त झाला आहे. ही घटना खूप दुखःद आहे. मी पीडित परिवारासोबत कायम उभा आहे, असं त्याने म्हटलं आहे. 

 

अल्लू अर्जुनने पुढे म्हटलं आहे की, 'मी त्या कुटुंबाला पूर्णपणे मदत करेन. मी सर्वांना धन्यवाद देईन आणि प्रार्थना करतो की असं कोणासोबत पुन्हा होऊ नये. माझा कायद्यावर विश्वास आहे आणि मी नेहमीच माझ्या चाहत्यांचा आभारी असेल,' असंही अल्लू अर्जून याने म्हटलं आहे. 

अल्लू अर्जूनने शुक्रवारची रात्री चिक्कडपल्ली सेंट्रल जेलमध्ये घालवली. कारण अटकेनंतरची त्याच्या जामीनाच्या प्रक्रियेला विलंब झाला. तेलंगणा उच्च न्यायालयाने आधीच अंतरिम जामिन दिला होता. मात्र, प्रशासनाच्या विलंबामुळं आणि जेल अधीक्षकाच्या गैरहजेरीमुळं त्यांचा जामीनाला विलंब झाला. 

मृत महिलेच्या पतीची प्रतिक्रिया

ज्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा पती भास्कर याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला अल्लू अर्जुनच्या अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितले, “अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.”