Siddharth Shuklaच्या मृत्यूच्या बातमीने फॅन कोमात, डॉक्टर म्हणाले...

सिद्धार्थची एक फॅन त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली.

Updated: Sep 5, 2021, 11:48 AM IST
Siddharth Shuklaच्या मृत्यूच्या बातमीने फॅन कोमात, डॉक्टर म्हणाले... title=

मुंबई : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये काम करणाऱ्या लाखो लोकांचा आवडता कंटेस्टंट आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या बातमीमुळे इंडस्ट्री आणि इंडस्ट्री बाहेरील अनेक लोक शोकात बुडून गेले आहेत. आयुष्याच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने हे जग सोडले आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूचा धक्का सिद्धार्थच्या जवळजे आणि काही चाहते  सहन करू शकत नाहीत. सध्या एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की, सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची एक फॅन कोमात गेली आहे. एका डॉक्टरने ही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे.

डॉ.जयेश ठकेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थची एक फॅन त्याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. या घटनेनंतर डॉक्टरांनी ट्विट करून सर्व चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

डॉक्टरांनी या मुलीचा फोटोही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. डॉक्टरांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, "मित्रांनो, तुमच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी बोला. एकटे राहू नका सिद्धार्थच्या एका चाहत्याला काल रात्री रुग्णालयात दाखल करावे लागले. कारण ती बाथरूममध्ये बेशुद्ध पडली होती. कृपया आपली काळजी घ्या. "

डॉक्टरांनी त्याच्या आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले, "अधिक ताणतणावामुळे, एखादी व्यक्ती अशा प्रकारे आंशिक कोमात जाऊ शकते. मला वाटते प्रत्येक चाहत्याने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. घडलेल्या घटनेबद्दल जास्त विचार करणे टाळा. तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. हे सोपे नाही, मला हे माहीत आहे. पण तुम्हाला ते करावे लागेल. "

पोलिसांनी सिद्धार्थच्या आईचे बयान नोंदवले

सिद्धार्थच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सिद्धार्थच्या आईचे स्टेटमेंट नोंदवले आहे. सिद्धार्थचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडेही चौकशी सुरू आहे. आईने सांगितले की, सिद्धार्थ रात्रीपर्यंत ठीक होता. जेवण झाल्यावर ते झोपायला गेले. पण सकाळी तो उठला नाही. सिद्धार्थच्या नातेवाईकांनी असेही म्हटले आहे की, तो कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाखाली नव्हता.