अभिनेत्री ब्रा घालून एअरपोर्टवर पोहोचली, कारण विचारताचं दिलं 'हे' उत्तर

बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद अलीकडेच मुंबई विमानतळावर ब्रा दाखवल्याबद्दल जोरदार ट्रोल झाली होती.

Updated: Sep 5, 2021, 11:38 AM IST
 अभिनेत्री ब्रा घालून एअरपोर्टवर पोहोचली, कारण विचारताचं दिलं 'हे' उत्तर title=

मुंबई : बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद अलीकडेच मुंबई विमानतळावर ब्रा दाखवल्याबद्दल जोरदार ट्रोल झाली होती. नेटकऱ्यांनी उर्फीच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याला पब्लिसिटी स्टंट म्हटले. आता उर्फीने यासंदर्भात आपले स्पष्टीकरण दिले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्फी म्हणाली, "जर मला फक्त प्रसिद्धी हवी असती तर मी कपड्यांशिवाय विमानतळावर गेले असते." त्याच वेळी, तिने नाराजी व्यक्त केली की लोक तिच्याबद्दल बोलण्याऐवजी तिच्या पोशाखांबद्दल बोलतात.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या उर्फीने तिचा विमानतळाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये उर्फीचे जॅकेट समोरून इतके लहान होते की तिची ब्रा दिसत होती. याबाबत ट्रोलर्सनी सोशल मीडियावर तिची खिल्लीही उडवली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर टीव्ही अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली होती. उर्फीने सांगितले की अडल्ट साईटवर तिचे फोटो अपलोड झाल्यानंतर त्याला कुटुंबाकडून कोणतेही समर्थन मिळाले नाही. यामुळे नातेवाईक तिला पॉर्न स्टार समजू लागले.