Adipurush : 'आदिपुरुष' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. हा चित्रपट चर्चेत असण्याचं कारण त्याती डायलॉग्स आणि त्यासोबतच याा चित्रपटाचे व्हिएफेक्स आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. चित्रपटातील डायलॉग्सवरून तर चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर चित्रपटातील ते डायलॉग्स काढून टाकण्यात आले. मीडियासमोर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह सोशल मीडियावर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनाही ट्रोल करण्यात आले होते. अखेर या सगळ्या वादानंतर 23 दिवसांनी मनोज मुंतशीर यांनी जाहीरपणे आपली चूक मान्य करत सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
मनोज मुंतशीरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सगळ्यांची जाहिरपणे माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की "मी मान्य करतो की, 'आदिपुरुष’ चित्रपटामुळे मी समस्त जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. मी माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आदरणीय साधू-संत आणि प्रभू श्रीरामाचे भक्त यांची हात जोडून क्षमा मागतो. भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!" असे ट्वीट करून त्यांनी जनतेची माफी मागितली आहे.
मनोज यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'हे खूप चांगल आहे. सगळ्यात आधी खिल्ली उडवा आणि मग जास्त झालं की त्यावर स्पष्टीकरण देत माफी मागा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'स्वीकार केल्यानं काय होणार आहे. आधीच जर चित्रपट बनवताना हा विचार केला असतास तर बरं झालं असतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बरं झालं कळलं पण इतक्या उशिरा कळलं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुला तुझ्या कामामुळे ओळख मिळाली होती, पण आता तू ही ओळख घालवली आहेस.' तर एक नेटकरी त्याला माफ करत म्हणाला की 'चूक कळली हे महत्त्वाच आहे. तर आता तुम्ही माफी मागितली आहे तर हनुमान देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहु द्या.'
हेही वाचा : किती गोड... Sankarshan Karhade च्या लेकिला त्याची आठवण येताच चिमुकली काय करते पाहिलं का?
'आदिपुरुष' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.