बॉलिवूड क्विन बनली पायलट! कंगनाचा बहुचर्चित चित्रपट 'तेजस' येणार 'या' तारखेला

Kangana Ranaut Tejas Movie: अभिनेत्री कंगना राणावतचा 'तेजस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना आपल्या या चित्रपटाचे पोस्टर सध्या पोस्ट केलं आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मग पाहुया की कसं आहे तिच्या सिनेमाचं पोस्टर 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 6, 2023, 10:31 PM IST
बॉलिवूड क्विन बनली पायलट! कंगनाचा बहुचर्चित चित्रपट 'तेजस' येणार 'या' तारखेला title=
Kangana Ranaut | Instagram

Kangana Ranaut Tejas Movie: कंगना राणावतच्या तेजस या चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या कंगनानं आपल्या इन्टाग्राम हॅण्डलवरून आपल्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या तिच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. देशासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पायलटची सध्या भुमिका ती करताना दिसते आहे. कंगनानं आपल्या सोशल मीडिया अकांऊंटवरून आपल्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या रिलिज डेटची घोषणा केली आहे. काही दिवसांपुर्वी तिच्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाची डेटही प्रदर्शित झाली होती. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कंगनाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. 

आपल्या हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याला सलाम. असं तिनं आपल्या या इन्टग्रामवर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिले आहे. हा चित्रपट अखेर 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिचा हा एक्शन मुव्ही पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्सही केल्या आहेत. एअरफोर्सचा युनिफॉर्म घालत कंगना एअरफोर्स प्लेनमधून येताना दिसते आहे. या चित्रपटातून ती एअरफोर्स ऑफिसर तेजस गिलच्या भुमिकेतून दिसणार आहे. त्यामुळे तिचा हा हटके अवतार पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. तिच्या या पोस्टखाली नानातऱ्हेच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

त्यामुळे आता सर्वत्र कंगनाचीच चर्चा आहे. मागच्या वर्षी तिनं आपल्या 'एमर्जन्सी' या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली होती. हुबेहुब देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लुकमध्ये पाहून तिचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. आता हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. सोबतच तिचा 'चंद्रमुखी' हा चित्रपटही ऑगस्टमध्ये प्रदर्शित होतो आहे. 

हेही वाचा - Orry नं शेअर केला Nysa Devgan सोबत मिरर सेल्फी; म्हणाला, ''मला सोडून जाऊ नकोस बेबी...''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगना आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे आणि त्यावरून कंगनानं अनेकदा आपली वक्तव्य मांडली आहेत. सध्या बॉलिवूडवर ती अनेकदा टीका करताना दिसते. काही दिवसांपुर्वी आलेल्या 'आदिपुरूष' या चित्रपटावरही तिनं टीका केली होती. त्यामुळे तिचे पोस्टही चर्चेत होते. यावेळी तिनं प्रभु श्री राम, सीता, हनुमान यांचे फोटो इन्टाग्रामवरून शेअर केले होते.