माझा मृत्यू झाला होता; श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया

Shreyas Talpade : श्रेयस तळपदे याने मृत्यूला चकवा दिला. हृदयविकाराचा तीव्र झटक्यातून सुखरुप बचावला आहे. यातून सावरल्यानंतर त्याने प्रथमच प्रतिक्रिये दिली आहे.

Updated: Jan 3, 2024, 03:56 PM IST
माझा मृत्यू झाला होता; श्रेयस तळपदेची पहिली प्रतिक्रिया title=

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे.  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने श्रेयस तळपदेची प्रकृती बिघडली होती. श्रेयस तळपदे याने मृत्यूची लढाई जिंकली. श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. श्रेयस तळपदे याने प्रथमच आपला अनुभव शेअर केला आहे. 

14 नोव्हेंबर 2023 रोजी श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. वेलकम टू जंगल या चित्रपटांचं शुटिंग संपवून श्रेयस घरी आला होता. त्यावेळी त्याची तब्येत बिघडली. दरम्यान त्याला चक्करही आली. श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रेयसची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.  यानंतर श्रेयसची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

श्रेयस तळपदेने शेअर केला विचलीत करणारा अनुभव

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. यानंतर प्रथमच श्रेयसने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नेमकं काय घडलं याचा  विचलीत करणारा अनुभव शेअर केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपला अनुभव सांगितला आहे. मी  मृत्यू अगदी जवळून अनुभवला आहे. मात्र, मी यातून वाचलो यासाठी  मी स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतो. मी खूप आभारी आहे. वैद्यकीयदृष्ट्या माझा मृत्यू झाला होता. मला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. हा माझ्यासाठी एक वेक-अप कॉल होता ज्याने मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

हृदयात 100 टक्के ब्लॉकेज 

श्रेयस याच्या हृदयाच्या दोन मुख्य धमन्या ब्लॉक झाल्या होत्या.  एक 100% आणि दुसरी 99 ब्लॉक होती. अँजिओप्लास्टीद्वारे स्टेंट बसवण्यात आला. मागील 2.5 वर्षांपासून नॉन स्टॉप काम करत आहे. चित्रपटाच्या शुटींगसाठी खूप प्रवास करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून  खूप थकवा जाणवत होता तरीही काम करतच होतो असे श्रेयसने सांगितले. स्वतःच्या का वैद्यकीय तपासण्या केल्या. ECG, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या. कोलेस्टेरॉल वाढले  होते. त्यासाठी औषधे घेत होतो असेही श्रेयसने सांगितले. हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्याने आता विशेष खबरदारी घेत असल्याचे त्याने सांगितले. आता आणि भविष्यात कायमसाठी सर्व काही ठीक असावे अशी आशा करतो असे श्रेयस म्हणाला.