जेव्हा ऐश्वर्याला मारहाणीच्या आरोपांवर सलमानला विचारला प्रश्न, म्हणाला- '...तर ती वाचलीच नसती!'

 सलमान खान आणि ऐश्वर्या रायमधील नातं सर्वांनाच माहिती आहे. या दोघांचं नातं हे नियतीला कधीच मंजूर नव्हतं, म्हणनूच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघांनीही आपल्या आयुष्याचा मार्ग बदलला.

Updated: Jan 3, 2024, 01:28 PM IST
जेव्हा ऐश्वर्याला मारहाणीच्या आरोपांवर सलमानला विचारला प्रश्न, म्हणाला- '...तर ती वाचलीच नसती!' title=

Salman Khan On Aishwarya Rai :  सलमान खान आणि ऐश्वर्या रायमधील नातं सर्वांनाच माहिती आहे. या दोघांचं नातं हे नियतीला कधीच मंजूर नव्हतं, म्हणनूच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघंही आपल्या रस्त्यावर चालू लागले. २००२ मध्ये ऐश्वर्या रायने खुलासा केला होता की, सलमान खान तिला खूप अपमानास्पद वागणूक द्यायचा. अभिनेत्रीने हे देखील सांगतिलं की, तो तिला मारहाण करायचा. आज ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जिवनात खूप खुश आहे. मात्र सलमान आजही सिंगल आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याचं बोलत आहेत. 

ऐश्वर्याने २००२ साली दिलेल्या एका मुलाखतीत असंही सांगितलं होतं की, सलमान दारु पिऊन धिंगाणा घालायचा. येवढंच नव्हेतर तिचा त्याने अनेकदा अपमानही केला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली होती की, मी कामावर असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. यामुळेच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडलं. आमचं नातं मोडलं. 

'ऐश्वर्याला मारलं असतं तर ती जगलीच नसती'
ऐश्वर्याने सलमान खानवर मारहाणीचे आणि शिवीगाळ केल्याचे आरोप लावले होते. काही दिवसांपुर्वी सलमानने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या सगळे आरोप फेटाळून लावले. त्याने इंडायरेक्टली सांगितलं की, जर त्याने खरंच ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचलीच नसती. सलमानने पुढे असंही सांगितलं की, आता त्या बाईने सांगितलं असं तर मी काय सांगू, एका पत्रकाराने खूप अगोदर मला विचारलं होतं तेव्हा मी टेबलावर जोरात हात आपटला तेव्हा तो हे बधून आश्चर्यचकित झाला होता की, टेबल खरंच तुटलं होतं. 
 
सलमानने पुढे म्हटलं की, तेव्हा मी असं म्हटलं की,  तेव्हा मी असं म्हटलं होतं की, आता जर मी कोणाला मारलं तर सहाजिकच आमच्यात खूप मोठं भांडणं होईल. मला राग येईल आणि तेव्हा मी माझा बेस्ट शॉट देईन. मला नाही वाटत ती यातून वाचेल. हे खरं नाही आहे आणि मला नाही माहिती ती असं का म्हणाली.''