मुंबई : फिल्मी दुनियेतील राजाबाबू कानपूरच्या जॅममध्ये अडकला, यादरम्यान लोकांनी त्याला घेरलं. झालं असं की, लोकांनी गोविंदासोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा लावली. यादरम्यान गोविंदाने काही लोकांसोबत सेल्फीही काढले आणि हात जोडून शुभेच्छा स्वीकारल्या.
कानपूरचा आवडीचे लाडू आणि चाट
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता गोविंदा कानपूरमध्ये होता. येथे गोविंदाने त्याच्या चाहत्यांचीही भेट घेतली. यादरम्यान गोविंदाने सांगितले की, मला कानपूरचे चाट आणि लाडू खूप आवडतात आणि कानपूरला पोहोचल्यानंतर चाट लाडूंचा आस्वाद घेण्याची गोष्ट वेगळी आहे.
खजुराहो फिल्म फेस्टिव्हलला जाण्यापूर्वी गोविंदाने कानपूरमध्ये चाहत्यांची भेट घेतली होती, त्यानंतर तो फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी निघून गेला होता. फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर गोविंदा लखनऊ गेला.
कानपूरच्या ट्राफिकमध्ये गोविंदा अडकला असताना त्याचे चाहते गाडीच्या पाठी पडले. यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली आणि त्यात गोविंदा फसला होता.
फिल्मसिटीबाबत ही गोष्ट सांगितली
खजुराहो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यापूर्वी गोविंदाने नोएडामध्ये बनवल्या जाणाऱ्या फिल्मसिटीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. फिल्मसिटीच्या निर्मितीमुळे उत्तर प्रदेशातील कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, असे त्याने म्हटले आहे.
गोविंदा म्हणाले की, सरकार खूप वेगाने विकास करत आहे. फिल्मसिटीच्या उभारणीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, तर सरकारने जेवरमध्ये विमानतळ बांधले आहे, त्यामुळे फिल्मसिटीला इतर राज्यांशी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल, त्याचा फायदा फिल्मसिटीला होईल.