ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय काशी विश्वनाथ दर्शनाला पोहोचली बच्चन फॅमिली!

Abhishek Bachchan Visits Kashi Vishwanath Temple In Varanasi : अभिषेक बच्चननं ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन...

दिक्षा पाटील | Updated: Jul 12, 2024, 01:43 PM IST
ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय काशी विश्वनाथ दर्शनाला पोहोचली बच्चन फॅमिली! title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan Visits Kashi Vishwanath Temple In Varanasi : बच्चन कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अभिषेक बच्चन त्याची आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन हे वाराणसीला पोहोचले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी काशी विश्वनाथ यांचे देखील दर्शन घेतले. दरम्यान, त्यांनी पूजा केली. या निमित्तानं अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंबासोबत दिसले नाही. इतकंच नाही तर अभिषेकची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन देखील दिसल्या नाही. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. 

ही आई-मुलाची जोडी जया बच्चन आणि अभिषेक बच्चन हे उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या काशी विश्वानाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत श्वेता देखील दिसली. 

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून अशी माहिती समोर आली आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला आहे. ते दोघं घटस्फोट घेण्याची शक्यता आहे. खरंतर, या संपूर्ण प्रकरणावर त्या दोघांनी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अनेकदा सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्या दोघांनी या बातमीचं काही न बोलता खंडन केलं. 

दरम्यान, या आधी नीता अंबानी या देखील काशी विश्वनाथच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका ही काशी विश्वनाथच्या मंदिरात देवासमोर ठेवली. अनंत आणि राधिका हे आज 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची लगबग सुरु झाली आहे. बॉलिवूड, टॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी या कार्यक्रमात पोहोचले आहेत. त्याशिवाय अनेक उद्योगपतींनी देखील हजेरी लावली आहे. 

हेही वाचा : 'शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली अन्...,' मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर 2' चा प्रवास 

अभिषेकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'बी हॅप्पी' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. त्याशिवाय तो शूजित सरकारच्या एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अजून ठरलेलं नाही. तर जया बच्चन यांच्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.