ऐश्वर्याला फॅनने लग्नाची मागणी घालताचं अभिषेकने दिलं सडेतोड उत्तर

जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत ऐश्वर्याचा समावेश होतो. 

Updated: May 21, 2021, 03:02 PM IST
ऐश्वर्याला फॅनने लग्नाची मागणी घालताचं अभिषेकने दिलं सडेतोड उत्तर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची फॅनफॉलोइंग तगडी आहे. खऱ्या आयुष्यात त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत ऐश्वर्याचा समावेश होतो. या जगसुंदरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत असतात. आता देखील ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एश्वर्याचा एक चाहता तिला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्याची मागणी कळताचं ऐश्वर्याचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनने त्या चाहत्यास सडेतोड उत्तर दिलं. जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक फोटोग्राफर्सना पोज देत होते. तेव्हा त्याठिकाणी चाहत्यांची एकचं गर्दी जमली होती. जमलेल्या एका चाहत्यांच्या हातात माझ्यासोबत लग्न करशील का? अशी पाटी होती. 

चाहत्यांची मागणी अभिषेक दिसताचं. अभिषेकने चाहत्यांला ऐश्वर्याने माझ्यासोबत लग्न केलं आहे. असं सांगितलं.. हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या तुफान व्हायरल होत आहे.  सांगायचं झालं तर ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007 साली लग्न केलं होतं. बच्चन हाऊसमध्येचं त्यांनी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगा आहे. तिचं नाव आराध्या असं आहे.