Video : मंदिरा बेदी ४९ वर्षाची वाटत नाही, हे १० हॅण्डस्टॅण्ड सांगतात, तिच्या तरुण दिसण्यामागचं रहस्य

 मंदिरा सोशल मीडियावर कायम फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. 

Updated: May 21, 2021, 02:05 PM IST
Video : मंदिरा बेदी ४९ वर्षाची वाटत नाही, हे १० हॅण्डस्टॅण्ड सांगतात, तिच्या तरुण दिसण्यामागचं रहस्य title=

मुंबई : टीव्ही इंडस्ड्री असो किंवा बॉलिवूड प्रत्येक कलाकार त्याच्या फिटनेसबद्दल अत्यंत जागृत असतो. वयाच्या 49व्या वर्षी देखील अभिनेत्री मंदिरा बेदी(Mandir Bedi) त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. मंदिरा सोशल मीडियावर कायम फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्या या व्हिडिओ आणि फोटोंवरून कळतं त्या किती फिटनेस फ्रिक आहेत.  आता देखील मंदिरा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्या अत्यंत फिटनेस फ्रिक दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिरा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवर फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आहे. आता तर त्यांनी हँडस्टँड करताना व्हिडिओ पाठवला आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील नक्कीचं थक्क व्हाल. मंदिरा यांच्या घरात हँडस्टँड करताना दिसत आहे.  

व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'माझं रूटीन. रोज 10 तर कधी 20 हँडस्टँड. त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे जेव्हा भींतीचा आधार न घेता हँडस्टँड करेल. पण काही घाई नाही. कोणत्याही प्रकारचा दबाव नाही...' असं मंदिराने लिहिलं असून चाहत्यांना देखील फिट राहाण्याचा सल्ला दिला आहे. मंदिरा यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.