Abhishek Bachchan Entry in Politics : पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. अशात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक हा राजकारणात पदार्पण करणार आहे ही बातमी समोर आली आहे. अभिषेकच्या राजकारणातील प्रवेशाच्या बातमीनं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की अमिताभ यांच्याप्रमाणे अभिषेक देखील निवडणूक लढवणार आहे.
अमिताभ हे कधी अलाहाबादचे खासदार होते. तर जया बच्चन या समाजवादी पार्टीतील राज्यसभेच्या खासदार आहेत. पण अभिषेकच्या राजकीय प्रवेशाविषयी चर्चा सुरु असली तरी देखील त्यावर अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. या सगळ्यात अभिषेकनं 10 वर्षांपूर्वी केलेलं त्याचं राजकारणावरील एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावेळी अभिषेकनं राजकारणात पदार्पण करण्यावर नकार दिला होता. त्यानं थेट मी राजकारणात प्रवेश करणार नाही असं म्हटलं होतं.
2013 साली अभिषेकनं ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राजकारणातील प्रवेशावर वक्तव्य केलं आहे. यावेळी अभिषेकला राजकारणातील प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अभिषेक म्हणाला होता की माझे आई-वडील हे राजकारणात सक्रिय आहेत. पण मी स्वत: मला तिथे नाही पाहत. राजकारणाची भूमिका असलेला मी चित्रपट करेन याची शक्यता आहे, पण खऱ्या आयुष्यात मी कधीच ही भूमिका साकारणार नाही. मी कधीच या सगळ्यात नाही येऊ शकत."
अभिषेक व्यतिरिक्त अमिताभ विषयी बोलायचे झाले तर 1984 साली त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन राजकारणात पदार्पण केलं होतं. अमिताभ यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचं कारण हे त्यांचे जवळचे मित्र राजीव गांधी होते. त्यांनी अलाहाबादमधूनचं निवडनूक लढवली होती. त्यावेळी अमिताभ यांना निवडणूक जिंकली आणि खासदार देखील झाले होते. पण त्यांच्या कार्यकाळाचा संपूर्ण वेळ संपण्या आधीच त्यांची राजीनामा दिला होता.
हेही वाचा : महेश कोठारे यांना मातृशोक, आदिनाथनं पोस्ट शेअर करत दिली माहिती...
दरम्यान, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिषेकनं 'दसवीं' या चित्रपटात राजकारणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात हा राजकारणी कशा प्रकारे तुरुंगात राहुन दहावीची परिक्षा देतो आणि इतकंच नाही तर पासही होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन हा उत्तर प्रदेशच्या राजकारणात पदार्पण करणार आहे. तर या बातमीवर अजून कुठुनही दुजोरा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता अभिषेकचे चाहते नक्की सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत.