ए आर रहमान यांचं गाणं आणि साथीला टाळ्याचा वर्षाव...पाहा हा रहमानियाँ

Indian Idol च्या मंचावर कायम गाण्यांची मैफल सजलेली असते.

Updated: Apr 9, 2021, 03:06 PM IST
ए आर रहमान यांचं गाणं आणि साथीला टाळ्याचा वर्षाव...पाहा हा रहमानियाँ title=

मुंबई : Indian Idol च्या मंचावर कायम गाण्यांची मैफल सजलेली असते. पण ही मैफल काही खास पाहुण्यांच्या मदतीने आणखी बहरते. यंदाच्या आठवड्यात संगीतकार ए आर रहमान Indian Idolच्या मंचावर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्सूकता तर आहेच, पण मनात दडपण देखील. त्यामुळे आता प्रत्येक संगीत चाहता  Indian Idolच्या सेटवर ए आर रहमान यांना ऐकायला व्याकूळ झाला आहे. 

सध्या शोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आशिष कुलकर्णीच्या वडिलांच्या विनंतीचा मान ठेवून ए आर रहमान यांनी ताल चित्रपटातील 'इश्क बिना क्या जीना यारो...' गाण्याच्या फक्त चार ओळी गायल्या. पण त्यांच्या त्या चार ओळींनी संपूर्ण वातावरणचं बदललं. साथीला सूर नसतानाही त्यांचा आवाजाने सर्वांनाचं थक्क केलं.