सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव

देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

shailesh musale Updated: Mar 28, 2018, 10:58 AM IST
सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव title=

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांनी महाभियोगाचा प्रस्ताव आल्याचं कबूल केलं आहे. मसुद्यात सरन्यायाधीशांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. त्याचप्रमाणे न्यायाधीश दीपक मिश्रा राजकीय दृष्ट्या संवेदनशील खटले विशिष्ठ न्यायमूर्तींकडे सोपवून हवा तो निकाल मिळवण्याचे प्रयत्न करतात असाही आरोप करण्यात आला आहे.