VIDEO : जगातील सर्वात बहादूर बदक, वाघाला केले हैराण

 वाघ आपल्या वजन आणि ताकदीसाठी ओळखला जातो. वाघ समोर आला की बड्या बड्यांची हालत खराब होते. वाघाच्या ऐकण्याची, वास घेण्याची आणि पाहण्याची क्षमता सर्वात जास्त असते.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 14, 2017, 06:51 PM IST
VIDEO : जगातील सर्वात बहादूर बदक, वाघाला केले हैराण title=

नवी दिल्ली :  वाघ आपल्या वजन आणि ताकदीसाठी ओळखला जातो. वाघ समोर आला की बड्या बड्यांची हालत खराब होते. वाघाच्या ऐकण्याची, वास घेण्याची आणि पाहण्याची क्षमता सर्वात जास्त असते.  

वाघ नेहमी मागून हल्ला करतो. मोठमोठे प्राणी वाघाच्या हल्ल्यातून वाजू शकत नाही. पण आज आम्ही तुम्हांला एक बदक दाखवणार आहे, ज्याने एका भल्या मोठ्या वाघाला हैराण केले. 

हा व्हिडिओ सिडनीतील टायगर सेंच्युरीतील आहे. या प्राणी संग्रहालयात वाघांसाठी पाण्यांचे छोटे तलाव तयार करण्यात येतात. या ठिकाणी पाणी पितात, उन्हाळ्यात डुंबतात. 

 

 

अशाच एका तलावात बदक गेले. बदकाची शिकार करण्यासाठी वाघाने झडप घेतली पण बदक त्याच्या तावडीत सापडले नाही. एकदा हल्ला झाल्यावर बदक त्या ठिकाणाहून पळाले नाही तर बहादुरीने ते पुन्हा वाघासमोर गेले. त्यावेळी वाघाने अनेकवेळा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या बदकाने चपळाईने स्वतःचा बचाव केला आणि वाघाला खूप हैराण केले. 

१२६ किलोचा सुमात्रन नावाचा वाघ डुंबत होता. त्या ठिकाणी बदक आले. बदल पाण्यात दिल्यावर वाघाच्या तोंडाला पाणी आले त्याने हल्ला केला. पण बदक त्याच्या जबड्यात आले नाही.