Viral Video: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी त्यांनी खूप मेहनत घेत आहेत त्यात ते खूप व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढला आणि पेनसिल्व्हेनियातील मॅकडोनाल्डमध्ये थांबले. यावेळी त्यांनी मॅकडोनाल्डमध्ये फ्रेंच फ्राईज बनवले. ॲक्टिव्हिटी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "मला फ्रेंच फ्राईज आवडतात. मला इथे काम करायलाही आवडतं. मी कमलापेक्षा 15 मिनिटे जास्त काम केले."
कमला हॅरिस यांच्या 'मिडल क्लास बॅकग्राउंड' च्या दाव्याला आव्हान देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पेनसिल्व्हेनियाच्या फेस्टरविले-ट्रेव्होस येथील मॅकडोनाल्ड येथे थांबले. आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध? तर याचं कनेक्शन असे की, आपल्या निवडणूक प्रचारात कमला हॅरिस यांनी त्यांच्या जुन्या कॉलेज दिवस आठवत सांगितले की, वॉशिंग्टनमधील हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्या कॅश रजिस्टरवर काम करायच्या आणि मॅकडोनाल्ड्समध्ये फ्राईज बनवायच्या. यावर द फिलाडेल्फिया इन्क्वायररच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की हॅरिसने मॅकडोनाल्डमध्ये कधीही काम केले नाही. ते म्हणाले की, "मॅकडोनाल्ड्समध्ये काम करणे हा तिच्या रेझ्युमेचा एक मोठा भाग होता, हे खूप कठीण काम होते. तिने फ्रेंच फ्राई केले आणि सांगितले की तिला उष्णतेचा खूप ताण आला. मी म्हणतो, तिने कधीही मॅकडोनाल्डमध्ये काम केले नाही."
ट्रम्प फ्राईज बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मॅकडोनाल्डच्या कर्मचाऱ्यांशी बोलत फ्राई बनवताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी रेस्टॉरंटच्या ड्राईव्ह-थ्रूमध्ये लोकांना पदार्थही दिले. यादरम्यान त्यांनी एका कुटुंबाशी बोलून त्यांना सांगितले की, यासाठी पैसे देण्याची गरज नाही, कारण ट्रम्प स्वत: यासाठी पैसे देतील. "मी आता कमलापेक्षा 15 मिनिटे जास्त काम केले आहे." असे ट्रम्प यांनी हॅरिसला टोमणा मारत बोलले.
A man of the people, Donald Trump is casually working at McDonalds today. pic.twitter.com/54orj0l5uB
— Dominic Michael Tripi (@DMichaelTripi) October 20, 2024
TRUMP: "I've now worked for 15 minutes more than Kamala."
REPORTER: "Why would she lie about that?"
TRUMP: "Because she's 'Lyin' Kamala.'" pic.twitter.com/gB1Y9RIct7
— Breaking911 (@Breaking911) October 20, 2024
दोन्ही उमेदवार पेनसिल्व्हेनियाच्या निवडणूक प्रचारात जीवाचे रान करत आहेत दोन्ही उमेदवार पेनसिल्व्हेनियामध्ये 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी विजयासाठी खूप प्रयत्न करत आहे. ट्रम्प आणि हॅरिस पेनसिल्व्हेनियावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, दोघांनीही येथे त्यांच्या निवडणूक मोहिमांना बळकट करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. या राज्यात हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची शर्यत आहे.