Viral Video : वाऱ्यापेक्षा वेगवान, चित्त्यापेक्षा चपळ, उसेन बोल्टलाही लाजवेल असा वेग...

सोशल मीडियावर (Social Media) धावपटूंचे अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. आता असाच एक व्हीडिओ व्हायरल झालाय.

Updated: Aug 23, 2022, 06:53 PM IST
Viral Video : वाऱ्यापेक्षा वेगवान, चित्त्यापेक्षा चपळ, उसेन बोल्टलाही लाजवेल असा वेग... title=

Viral Video : उत्तम धावपटू होणं हे खायचं काम नाही. चांगला धावपटू होण्यासाठी कठीण परीश्रम, सातत्य आणि सराव महत्त्वाचं असतं. उसेन बोल्ट सर्वांनाच माहिती असेल. उसेन महान धावपटूंपैकी एक आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. उसेन बोल्ट व्यतिरिक्त अनेक धावपटू आहेत, ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलीय. सोशल मीडियावर (Social Media) धावपटूंचे अनेक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. आता असाच एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओत एक गंमत आहे. ज्याने ज्याने हा व्हीडिओ पाहिलाय ते सर्व हैराण झालेत.  (viral video cameraman run fast than other runners watch full video)  

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हीडिओ आहे. या अशा स्पर्धांमध्ये कॅमेरामॅनची भूमिका महत्त्वाची असते. बारीक बारीक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. या व्हायरल व्हीडिओत चक्क कॅमेरामॅनच धावपटूंच्या पुढे धावताना दिसतोय. कॅमेरामॅनला धावपटूंपेक्षा भरधाव वेगात धावताना पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायेत. तर या 'कॅमेरामॅनने चुकीचं करिअर निवडलं, याने धावपटू व्हायला पाहिजे होतं', अशाही काही गंमतीशीर प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत.

अवघ्या 10 सेकंदांचा असलेला व्हीडिओ 16 हजारापेक्षा अधिक जणांनी पाहिलाय. तर अनेकांनी हा व्हीडिओ लाईकही केलाय. तर या व्हीडिओवर विविध कमेंट्सही करण्यात आलायेत. कोणी कॅमेरामॅनलाच विजयी घोषित केलंय. तर या कॅमेरामॅनला ऑल्मिपकसाठी पाठवा, अशीही कमेंट करण्यात आलीय.