Aliens in deep ocean?: बर्फामध्ये वास्तव्य, रेडियमसारखे डोळे; अतिशीत बर्फाळ समुद्रात आढळले एलियन्स?

आर्क्टिक सर्कलमध्ये संशोधकांना माशांची अशी प्रजाती  आढळली आहे ज्याने संशोधक चांगलेच हैराण झाले आहेत. या प्रजातीचे डोळे रेडियमसारखे चमकतात. 

Updated: Aug 23, 2022, 04:47 PM IST
Aliens in deep ocean?: बर्फामध्ये वास्तव्य, रेडियमसारखे डोळे; अतिशीत बर्फाळ समुद्रात आढळले एलियन्स? title=

Aliens In deep cold arctic ocean: आर्क्टिक सर्कलमध्ये संशोधकांना माशांची अशी प्रजाती  आढळली आहे ज्याने संशोधक चांगलेच हैराण झाले आहेत. या प्रजातीचे डोळे रेडियमसारखे चमकतात. 

आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत अजूनही आपल्याला ठाऊक नाही. म्हणूनच माणसाकडून कायम संशोधन सुरु असतं. आर्क्टिकमध्ये बर्फाखाली आढळणाऱ्या एका माशांच्या प्रजातीबाबत संशोधकांना नुकतीच माहिती मिळाली आहे. या प्रजातीने संशोधकांना चांगलंच हैराण केलं आहे. या माशांचे डोळे रेडियमसारखे चमकतात. या माशांच्या शरीरात रक्तामध्ये अँटी फ्रीझ प्रोटीन असतं, ज्यामुळे या माशांच्या रंग चमकदार हिरवा पाहायला मिळतो.  अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील संशोधक आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू-यॉर्कच्या बारूच कॉलजमधील जैव विज्ञान विषयातील प्रोफेसर डेव्हिड ग्रुबर यांनी या अभ्यासाचं नेतृत्व केलं आहे. 

एलियनसारखा दिसणारा चमकदार डोळ्यांचा मासा 

स्नेल्फिश ही बर्फाळ डोंगरांच्या फटींमध्ये आढळणाऱ्या माशांची प्रजाती आहे. अतिशीत वातावरणात हा मासा जिवंत राहू शकतो, ही एक आश्चर्याची बाब आहे. संशोधकांच्या मते या माशांमधील अँटी फ्रीझ प्रोटिन्समुळे हा मासा इतक्या थंडीतही जिवंत राहू शकतो.   

या माशाचे डोळे का चमकतात? 

संशोधकांच्या माहितीनुसार उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील माशांनी आपल्या शरीरात हे प्रोटिन्स विकसित केले आहेत. ग्रीनलँडमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये ही  महत्त्वाची बाब समोर आली आहे. समुद्री जीवांमध्ये काळानुरूप परिवर्तन होतं आहे. अशात, आर्क्टिकसारख्या अतिथंड क्षेत्रात आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या माशांमध्ये हे खास बदल झाल्याचं पाहायला मिळतं. 

फोटो झाले व्हायरल

या माशांचे फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झालेत. अनेकांनी हे मासे एलियन्स असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. 

aliens like snailfish with glowing eyes and skin found in arctic ocean